Nana Patole । ‘केंद्रातील मोदी सरकार इंग्रज राजवटीपेक्षाही जुलमी, अत्याचारी’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Nana Patole ।  शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्राने तीन काळे कृषी कायदे (Agricultural Act) आणले आहेत. हे सरकार शेतकरी(Farmers), कष्टकरी विरोधी असून शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवून देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत. मोदी सरकार (Modi government) घालवल्याशिवाय या देशातील शेतकरी, कष्टकरी यांचे अच्छे दिन येणार नाहीत, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलीय. तसेच, केंद्रातील मोदी सरकार (Modi government) हे इंग्रज राजवटीपेक्षा जुलमी व अत्याचारी आहे, अशी घणाघाती टीका देखील पटोलेंनी (Nana Patole) भाजपवर केलीय. पटोले (Nana Patole) हे आज (बुधवारी) जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील फैजपूर (Faizpur) येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर त्यांनी माध्यमाशी सवांद साधला.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे जुलमी कायदे रद्द झालेच पाहिजेत..

केंद्रातील अत्याचारी मोदी सरकारला शेतकऱ्यांसाठी वेळ देता येत नाही. तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनात 400 शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल्या नरेंद्र मोदी यांनी या शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. शेतकरी थंडी, पाऊस, उन्हात आंदोलन करत असताना पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन प्रचारात व्यस्त होते. हे जुलमी कायदे रद्द झालेच पाहिजेत अशी काँग्रेसची भूमिका आहे. असं ते (Nana Patole) म्हणाले.

कोरोना परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी..

देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकार अपयशी ठरले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना बाबत महत्वाचे सल्ले दिले होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. याची किंमत देशाला हजारो बळी देऊन मोजावी लागली आहे. कालच राहुल गांधी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत इशारा देत योग्य ती पावले उचलण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन लाटेत मोदी सरकारच्या अक्षम्य चुकांमुळे निष्पाप लोकांचे बळी गेले. आतातरी सरकारने जागे व्हावे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. असे पटोलेंनी (Nana Patole) म्हटलं आहे.

सात वर्षांत देशात अनागोंदी वाढली..

पटोले म्हणाले, (Nana Patole) पीक वीमा योजनेतूनही शेतकऱ्यांना लुटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल मोठ्या प्रमाणात महाग झाले आहे, बरोजगारी वाढली आहे याविरोधात काँग्रेस लढा देत आहे. कोरोना संकटामुळे मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यास बंधने आहेत मात्र काँग्रेसने कोरोनाचे नियम पाळून मोदी सरकारच्या विरोधात आंदोलने केली आहेत आणि पुढेही करत राहू. यावरून मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या काळात देशात अनागोंदी वाढली आहे.

2024 मध्‍ये जनता धडा शिकवेल..

फैजपूर येथे काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन घेण्यात आले होते. तेव्हाचा लढा हा इंग्रजांच्या विरूध्द होता. तर सध्याचे केंद्र सरकार हे इंग्रजांप्रमाणेच अत्याचारी असल्याचा आरोप पटोले (Nana Patole) यांनी केला. देशात सरकार विरूध्द संतप्त भावना असून भाजपला 2024 साली जनता धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी (Nana Patole) केला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : nana patole | modi government center more oppressive british rule congress nana patole criticize

हे देखील वाचा

कोरोनाच्या संपूर्ण कुटुंबाचा ‘खात्मा’ करणार ‘ही’ व्हॅक्सीन ! पुढील वर्षी होऊ शकते मनुष्यावर ट्रायल

Fake Call Centre Mumbai | मुंबईत 2 बनावट कॉलसेंटरवर छापे, दोघांना अटक

Pune Crime News | मंगळसूत्र हिसकावताना ‘बंटी-बबली’ची 60 वर्षीय महिलेसोबत झटापट, 1.86 लाखाचे दागिने लांबविले

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील वर्षापर्यंत मिळत राहील घर बांधण्यासाठी नाममात्र व्याज दरावर अ‍ॅडव्हान्स