Nana Patole On Ajit Pawar | ‘अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला’, नाना पटोलेंची सडकून टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अजित पवार आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सरड्यासारखा रंग बदलला आहे. सत्तेत गेलेले लोक वास्तव लपवत आहेत. सरड्यासारखं होऊ नका अशी आमची त्यांना सूचना आहे, असं म्हणत काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole On Ajit Pawar) यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर टीका केली. सरडा हा रंग बदलणारा प्राणी आहे. मी त्यांना सरडा म्हणण्याचे कारण हे आहे की सत्तेत गेल्यानंतर ते आता वेगळंच वागत आहेत, असंही नाना पटोले (Nana Patole On Ajit Pawar)

इगतपुरीत एका गरोदर मातेचा मृत्यू (Pregnant Woman Death Case) झाला. या घटनेचे विधानसभेत (Assembly) जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून नाना पटोले (Nana Patole On Ajit Pawar) यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरु आहे. पुरवण्या मागण्या मान्य झाल्या आहेत. आदिवासी भागात रस्ते नाहीत. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याबाबत आम्ही सभागृहात विषय मांडला. पुरवण्या मान्य केल्या, पण एवढा पैसा आणणार कुठून? असा सवाल आम्ही केला. ज्यांच्याकडून पैसे घेता त्यामध्ये आदिवासी देखील आहेत. पण आदिवासी लोकांना सोयी सुविधा काय देताय? भाजप (BJP) केवळ मूठभर लोकांना सोयी सुविधा देताहेत. सत्तेचा माज जो भाजपला आला आहे. हा माज लोकं उतरवणार, असंही नाना पटोले म्हणाले.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)
यांनी टोलच्या मुद्यावर भाजपावर टीका केली. त्याबाबत प्रश्न विचारला असता
पटोले यांनी राज ठाकरेंनी मांडलेला मुद्दा योग्यच असल्याचे म्हटले.
तसेच भाजपावाले टोलमुक्त महाराष्ट्र (Toll Free Maharashtra)
ओरडत होते त्याचं काय झालं? भाजपकडून समृद्धी महामार्गावर
(Samruddhi Highway) निर्दोषांची हत्या केली जाते आहे असाही गंभीर आरोप
नाना पटोले यांनी केला. तसेच मणिपूर जळत (Manipur Violence) आहे,
तिथला एक अत्यंत भयंकर व्हिडिओ समोर आला आहे तरीही
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यावर काहीही बोलत नाहीत, असंही ते म्हणाले.

हे सरकार घोषणेचा पाऊस पाडणारं सरकार आहे.
या सरकारला आमचं आव्हान आहे की घोषणा करून शेतकऱ्यांच्या
जखमेवर मीठ चोळू नका. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारमुळे होत आहेत.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येला हे भाजप सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

ACB Trap News | 60 हजार रुपये लाच मागणारा क्लास वन अधिकारी
अँन्टी करप्शनच्या जाळ्यात