Nana Patole On Maharashtra Shinde Fadnavis Pawar Govt | सरकारमधील मंत्री बोलतात एक आणि दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देतात, आरक्षणावरून नाना पटोलेंची टीका

मुंबई : Nana Patole On Maharashtra Shinde Fadnavis Pawar Govt | सध्या मराठा आरक्षणावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत उद्या संपत आहे. यावरून खा. सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule), खा. संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला घेरले आहे. (Nana Patole On Maharashtra Shinde Fadnavis Pawar Govt)

नाना पटोले यांनी म्हटले की, राज्यात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा व ओबीसी समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत. ट्रिपल इंजिन सरकारची आरक्षणप्रश्नी स्पष्ट भूमिका नसल्याने हा गुंता वाढतोय. समाजा-समाजात संशय वाढतोय. राज्य सरकारमध्ये आरक्षण प्रश्नावर एकवाक्यता नाही. (Nana Patole On Maharashtra Shinde Fadnavis Pawar Govt)

पटोले म्हणाले, सरकारमधील मंत्री बोलतात एक व तर दुसरीकडे जाहिरात देऊन वेगळाच संदेश देतात, ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्यास ट्रिपल इंजिन सरकारच जबाबदार आहे. राज्य सरकारने याप्रश्नी ठोस भुमिका मांडून मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल थांबवावी.

नाना पटोले पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सांगत आहेत, मग मराठा समाजाला आरक्षण देण्यापासून त्यांना कोणी रोखलेय? १० वर्ष होत आली केंद्रात मोदी सरकार आहे, आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?

पटोले म्हणाले, नुकत्याच झालेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात ५० टक्के मर्यादा काढण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असता तर हा प्रश्न निकाली निघाला असता. आता मोदी सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे, डिसेंबर महिन्यात संसदेचे शेवटचे अधिवेशन होईल, त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आचारसंहिता लागू शकते.

पटोले म्हणाले, एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देणे चुकीचे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत, ते योग्यच आहे,
पण राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतात ते कळतच नाही.
दुसरे उपमुख्यमंत्री वेगळेच बोलतात. हे सर्व थांबवून ठोस भूमिका मांडा.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जातनिहाय जनगणना करावी तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवा या
राहुल गांधी यांच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा द्यावा, हे सर्व प्रश्न मार्गी लागू शकतात, असे पटोले म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांचे डड्ढग्ज सापडले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले,
गुजरातच्या मुंद्रा बंदरात तीन-चार वेळा कोट्यवधी रुपयांचे डड्ढग्ज सापडले. देशातील बंदरे मित्रोंना दिल्यापासून
देशभरात ड्रग्स मोठ्या प्रमाणात येत आहे. या सर्वांचे मुळ या खाजगी बंदरांमध्ये आहे.
भाजपा सरकार तरुणांना ड्रग्स व बिअर उपलब्ध करुन देऊन नशेत डुबवण्याचे पाप करत आहे.

नाना पटोले म्हणाले, शिंदे सरकारने तर आता बियरच्या किमती कमी करण्यासाठी समिती नेमली आहे.
उद्या हे सरकार रेशनवरही बिअर देईल, पाण्याच्या जागी बिअरच प्या, असेही धोरण आणतात की काय? असा प्रश्न आहे.
भाजपाचे सरकार तरुण पिढीला बरबाद करण्याचे काम करत आहे हा आरोप नसून वस्तुस्थिती आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | ऑनलाईन गेमिंगमुळे पोलीस कर्मचारी बनला कर्जबाजारी, कर्ज फेडण्यासाठी लुटमारी करताना गोळीबार; एकाचा मृत्यू तर एक जखमी

Pune News | डीजे, लेझरविरोधी भूमिकेबद्दल कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांना धमकी