Nanded News । खळबळजनक ! बायकोला नांदायला न पाठवल्यानं सासूच्या डोक्यात घातलं दगडी जातं, अन् स्वतः घेतला गळफास

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – Nanded News । नांदेड (Nanded) जिल्ह्यातील भाग्यनगर (Bhagyanagar) येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीला नांदायला न पाठवल्याने संतप्त जावयाने सासूच्या घरात कुणी नसल्याचं बघून आला आणि सासूच्या डोक्यात त्यानं दळण दळायचं जातं घालून निर्घृण हत्या (Murder) केलीय. यांनतर आरोपी जावयानेही खुद्द गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. मालिनी बाहेकर (वय, 56) असं खून करण्यात आलेल्या सासूचे नाव आहे. तर श्रीकांत शंकरराव पाडदेवाड असे त्या आरोपी अर्थात हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या दोन्ही धक्कादायक मृत्यूमुळे भाग्यनगर गावामध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी जावयाने 4 जुलै रोजी घरात कुणी नसताना आपल्या
सासूच्या डोक्यात जातं घालून तिचा निर्घृण खून केला आहे. दरम्यान, गेल्या बऱ्याच दिवसांपासून
सासूबाई पत्नीला नांदायला पाठवत नाही, हा राग मनात धरून जावयाने आपल्या सासूची निर्घृण
हत्या (Murder) केलीय. तरोडा भागातील भावसारनगर परिसरातील रहिवासी असणाऱ्या मृत
मालिनी बाहेकर यांची मुलगी मोहिनीचा 6 वर्षांपूर्वी श्रीकांत पाडदेवाड याच्यासोबत आंतरजातीय
विवाह झाला होता. मोहिनी या लातूरमधील एका खाजगी बँकेत नोकरीला होत्या, तर मृत श्रीकांत हा
लातूरमधील एका हॉटेलमध्ये वॉर्डन म्हणून काम करत होता. पण लॉकडाऊनमुळे श्रीकांतची नोकरी
गेली होती. या मुद्यावरून अस्वस्थ झालेल्या श्रीकांतला दारुचे व्यसन लागलं होतं.

Yavatmal News । संशयिताचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू; संतप्त जमावाचा दारव्हा पोलीस ठाण्यावर हल्ला, 2 पोलिस जखमी (व्हिडिओ)

या दरम्यान, दारुच्या व्यसनामुळे श्रीकांत पाडदेवाडचे (Shrikant Paddewad) त्याची पत्नी मोहिनीसोबत सतत वाद होत होता. म्हणून संतापाच्या भरात पत्नी मोहिनी माहेरी निघून आली. यानंतर जावई श्रीकांतनं पत्नीला माघारी घेऊन आणण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, सासू मुलीला नांदवायला परत पाठवायला तयार झाली नाही. अनेक विनंत्या करून देखील सासूनं जावयाचं ऐकलं नाही. या मुद्यावरूनच राग मनात धरून जावयानं 4 जुलै रोजी घरात कुणी नसताना सासूच्या डोक्यात दगडी जाते घालून निर्घृण हत्या केली. तसेच स्वतःही गळफास घेत आत्महत्या केलीय. याप्रकरणी मंगळवारी भाग्यनगर पोलीस ठाण्यात (Bhagyanagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : nanded news | son in law killed mother in law for not sending wife back to home nanded

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update