Nandurbar Police | खाकी वर्दीतील माणुसकी! अपघातातील मृत पोलीस अंमलदाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, नंदुरबार पोलीस अधीक्षक पीआर पाटील याच्या हस्ते धनादेश सुपुर्द

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) दलातील तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda Police Station) नेमणूकीस असलेले पोलीस अंमलदार मुकेश अशोक सावळे (Police Officer Mukesh Sawle) यांचा 18 जुलै रोजी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ अपघात झाला होता. या अपघातात मुकेश सावळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. मृत पोलीस अंमलदाराच्या कुटुंबासाठी स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना केले होते. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनाला जिल्ह्यतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी प्रतिसाद देत पैसे जमा केले होते. जामा झालेल्या पैशांचा धनादेश पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील याच्या हस्ते मुकेश साळवे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (दि.2) सुपूर्द करण्यात आला. (Nandurbar Police)

पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांचा 18 जुलै रोजी शहरातील आरटीओ कार्यालयाजवळ अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सावळे यांना तातडीने सुरत येथील युनिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सावळे यांच्या उपचारासाठी तातडीची मदत म्हणून जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 1 लाख 30 हजार रुपयांची मदत केली होती. मात्र, मुकेश सावळे यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. 22 जुलै रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे आवाहन पी.आर. पाटील यांनी केल्यानंतर सावळे यांच्या परिवाराकरीता 3 लाख 35 हजार रुपयांचा मदत निधी अल्पावधीत जमा झाली. सर्वप्रथम पीआर पाटील यांनी मदतनिधी दिला. पोलीस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मयत पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांच्या कुटुंबीयांना गुरुवारी पीआर पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्य़ालयात सावळे यांच्या कुटुंबाला मदतनिधीचा धनादेश देण्यात आला. नंदुराबर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वेच्छेने 4 लाख 65 हजार रुपयांची मदत मयत पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांच्या कुटुंबीयांना दिली आहे. मदत निधीचा धनादेश स्वीकारताना मयत पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांच्या आई उषाबाई सावळे व पत्नी प्रतिभा सावळे यांना अश्रु अनावर झाले.

यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले, मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबीयांच्या ज्या काही अडीअडचणी
असतील त्या प्रत्यक्ष भेटून मांडाव्यात. त्या निश्चीतच सोडविल्या जातील. तसेच त्यांना मिळणारे सर्व प्रकारचे लाभ
लवकरात लवकर देण्यात येतील असे आश्वासन दिले. (Nandurbar Police)

यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय)
विश्वास वळवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे,
पोलीस निरीक्षक गौकुळ औताडे, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र जगताप, तळोदा पोलीस ठाण्याचे
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्यासह मयत पोलीस अंमलदार मुकेश सावळे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंनी सरकारला खडसावलं, मराठा कोण आहेत? पाकिस्तान की अमेरिकेतील? ‘त्यांचा…’