Nandurbar Police – International Women’s Day | जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी नंदुरबार पोलिसांचा ‘ऑपरेशन अक्षता’ उपक्रम

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – Nandurbar Police – International Women’s Day | जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) देशासह राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून महिलांवरील होणारे हिंसाचार तसेच बाल विवाह रोखण्यासाठी ‘ऑपरेशन अक्षता’ (Operation Akshata) मोहिम सुरु करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री (IAS Manisha Khatri) यांच्या हस्ते या महत्वकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावपातळीवर विविध घटकांचा समावेश असलेल्या पथकाद्वारे जनजागृतीसह बालविवाह रोखण्याचे काम केले जाणार आहे.

 

राज्यात महिला दिनानिमित्त महिल गौरवाचा जागर होत असताना नंदुरबार पोलीस दलाने (Nandurbar Police) जिल्ह्यातील महिलांच्या सन्मानासाठी आगळी वेगळी मोहिम हाती घेतली आहे. आदिवासी बहूल नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह (Child Marriage) होतात, मात्र त्याबबात कोणतीही तक्रार केली जात नाही. नंदुरबार जिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन अक्षता’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

 

 

बाल विवाह रोखण्याबरोबच महिला व मुली हरवणे, अपहरण, लैंगिक गुन्ह्यांचा तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांबाबत देखील या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना करणे शक्य होणार आहे. तसेच जिल्ह्यात होणारा प्रत्येक बाल विवाह रोखला जावून शेवटच्या घटकापर्य़ंत बाल विवाह विरोधी जागरुकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गाव पातळीवर अशा स्वयंसेवीका, पोलीस पाटील, सरपंच, प्राथमीक आरोग्य केंद्रातील परिचारीका व पोलीस बिट अंमलदार यांची भूमिका महत्वाची असणार आहे. गाव पातळीवर होणारे बाल विवाह या सर्व घटकांच्या माध्यमातून निश्चितपणे रोखले जाऊ शकतात, असे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी सांगितले.

यावेळी बाल विवाह विरोधी ठराव करणाऱ्या कोराई ग्रामपंचायतीचे सरपंच राजु तडवी, ग्रामसेवक गणेश वसावे,
पोलीस पाटील अनिल वसावे आणि भुजगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता पावरा, ग्रामसेवक हेमंत राठोड,
पोलीस पाटील दिपक पावरा यांचा पोलीस दलाच्या वतीने प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते या मोहिमेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe),
पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी (Deputy Superintendent of Police (Headquarters) Vishwas Devi),
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Officer Sachin Hire),
अक्कलकुवा विभागाचे उपविभीगाय पोलीस अधिकारी संभाजी सावंत (Sambhaji Sawant),
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा निता देसाई,
जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी, महिला व बाल विकास अधिकारी कृष्णा राठोड,
लायन्स क्लबच्या तेजल चौधरी यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

 

Web Title :-  Nandurbar Police – International Women’s Day | Nandurbar Police’s ‘Operation Akshata’ initiative to prevent child marriage in the district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Vijaykumar Gavit | संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Economic Survey of Maharashtra | ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या