Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हातगाडीवर विसरलेली वॉकीटॉकी घेण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार करुन आणि समोरचे दात तोडून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील विमानतळ परिसरात घडली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीला विमानतळ पोलिसांनी (Pune Police) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. ही घटना (Pune Crime News) 25 सप्टेंबर 2022 रोजी घडली होती.

याबाबत आनंद महेश नडगम यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली होती. पोलिसांनी आयपीसी 307 नुसार फिरोज मोहम्मद शेख (Feroze Mohammad Shaikh) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फिरोज शेख हा पसार होऊन पोलिसांना गुंगारा देत होता.

फिर्य़ादी हे त्यांच्याकडे असलेली वॉकीटॉकी हातगाडीवर विसले होते. ते वॉकीटॉकी घेण्यासाठी गेले असता आरोपी फिरोज शेख व त्याच्या तीन साथीदारांनी वॉकीटॉकी जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिरोज याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार करुन त्यांचे समोरचे दोन दात अर्धवट तोडून गंभीर जखमी केली.

दाखल गुन्ह्यातील आरोपी फिरोज शेख त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलीस शिपाई नाना कर्चे व
योगेश थोपटे यांना समजली. त्यानंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त परिमंडळ – 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate)
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक गुन्हे संगिता माळी (Police Inspector Sangita Mali),
पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (PSI Ravindra Dhaware), पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम,
सचिन जाधव, रुपेश पिसाळ, गिरीश नाणेकर, नाना कर्चे, योगेश थोपटे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | The viman nagar police handcuffed the accused who escaped after being assaulted by a koyta

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान स्वप्निल पाडाळेचे निधन, लाल मातीतच घेतला अखेरचा श्वास; दुर्दैवी घटनेमुळे पुणे हळहळलं

Devendra Fadnavis | अवकाळी पावसामुळे 8 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती

Pune PMC Property Tax | मिळकतकर सवलतीसाठी पुढील आठवड्यात बैठक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन