Nandurbar Police – International Women’s Day | जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – महिला दिनाचे (International Women’s Day) औचित्य साधून नंदुरबार पोलीसांनी (Nandurbar Police) महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची बाईक रॅली (Bike Rally) आयोजित केली होती. सुमारे 150 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यात सहभागी झाले होते. या निमित्ताने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन अक्षता’ या उपक्रमाचा शुभारंभ झाल्यानंतर जनमानसात बाल विवाह विरोधी जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता. नंदुरबारचे पोलीस (Nandurbar Police) अधीक्षक पी.आर.पाटील (SP P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून या वेगळ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

 

महिलांना सन्मान मिळण्याबरोबरच हेल्मेट (Helmet) वापराबाबत जागृती (Awareness) करण्याच्या निमित्ताने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबारच्या (Nandurbar Police) रस्त्यावर महिला पोलिसांची अशा प्रकारची बाईक रॅली निघाल्याने रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. या रॅलीला नागरिकांनीही जोरदार प्रतिसाद देत घरांच्या गच्ची व गॅलरीतून महिला पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. जागोजागी लोक या वेगळ्या रॅलीचे चित्रिकरण आपल्या मोबाईलमध्ये करताना दिसून येत होते.

 

 

सकाळी साडे अकरा वाजता नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील व नंदुरबार लायन्स क्लबच्या (Nandurbar Lions Club) डॉ. तेजल चौधरी (Dr. Tejal Chaudhary) यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. शहरातील विविध मार्गावरुन ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये महिला अधिकारी व अंमलदार यांनी बाल विवाह प्रतिबंधक (Prevention of Child Marriage) उपक्रमाचे फलक हाती घेऊन जनजागृती केली.

मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (Superintendent of Police P.R. Patil),
अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे (Addl SP Nilesh Tambe), उपविभागीय अधीकारी सचिन हिरे (Sub Divisional Officer Sachin Hire)
यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार ह्या रॅलीला उपस्थित होते.

 

Web Title :- Nandurbar Police – International Women’s Day | Nandurbar Women Police bike rally on the occasion of International Women’s Day

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Dr. Vijaykumar Gavit | संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार; आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Economic Survey of Maharashtra | ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०२२-२३’ अहवाल विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर

Pune Crime News | कोयत्याने प्राणघातक हल्ला करुन फरार झालेल्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या