Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेच्या वादातून वृद्धाला पेट्रोल (Petrol) टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न (Attempt to Burn Alive) करणाऱ्या 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांच्या (Nandurbar Police) स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) गुन्ह्याचा तपास करुन अवघ्या 12 तासात मुख्य आरोपीसह इतरांना अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही आरोपी परराज्यात पळून गेले होते. वृद्धाला जिवंत जाळण्याची ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा (Sorapada, Akkalkuwa Taluka) येथे शनिवारी (दि.12) पहाटे 3.30 सुमारास घडली आहे.

 

बुल्या हांद्या वळवी (वय-55 रा. सोरापाडा ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे जखमी झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी धरमदास उर्फ भाऊ वेड्या वळवी (वय-40), रविंद्र बटन पवार (वय-33 दोघे रा. आमलीफळी खापर, ता. अक्कलकुवा), नकुल उर्फ गटुर अशोक वसावे (वय-25 रा. अमलीफळी खापर ता. अक्कलकुवा), अरुण शांताराम वसावे (वय-21 रा. चांदपुर ता. अक्कलकुवा), रहिमोद्दीन जलालुद्दीन पिंजारी (वय-48 रा. आमलीफळी खापर ता. अक्कलकुवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Nandurbar Police)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुल्या हांद्या वळवी हे शनिवारी त्यांच्या घराच्या अंगणात झोपले होते. पहाटे 3.30 च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती तोडाला रुमाल बांधून त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने हातातील बाटलीतील पेट्रोल अंगावर टाकले व दुसऱ्या व्यक्तीने आगपेटीने काडी (आग) लावून फिर्यादीस जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात (Akkalkuwa Police Station) अज्ञात आरोपींविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला म्हणून गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. तर जखमी वाळवी यांना जिल्हा रुग्णालय नंदुरबार (District Hospital Nandurbar) येथे दाखल करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police PR Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार हे घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे (Local Crime Branch) पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे (Police Inspector Rajesh Shingte) यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करुन आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याचे निर्देश देण्यात आले.

 

जखमी बुल्या वळवी हे सुरुवातीला काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. मात्र प्राथमिक उपचारानंतर ते थोडे फार बोलू लागले. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आरोपींपैकी एकाचे केस मोठे होते व एक जण उंच व बारीक होता, अशी त्रोटक माहिती पोलिसांना दिली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी सोरापाडा येथील वृद्ध व्यक्तीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारे संशयीत आरोपी खापर येथील यात्रेत सोबत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने खापर येथे जाऊन दोन संशयितांचा शोध घेतला. पथकाला एका उसाच्या रसवंतीवर दोन व्यक्ती बसलेले दिसून आले. त्यातील एकाचे केस मोठे व एक शरीराने बारीक होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून ते संशयास्पद हालचाली करत होते. पथकाने धरमदास उर्फ भाऊ वेड्या वळवी (Dharamdas alias Bhau Vedya Valvi), रविंद्र बटन पवार (Ravindra Button Pawar) यांना ताब्यात घेतले.

 

दोन्ही आरोपींचे फोटो काढून फिर्यादी बुल्या वळवी यांना दाखवण्यात आले. त्यावेळी फिर्यादी यांनी दोघांना ओळखले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी हा गुन्हा नकुल, रहीमोद्दीन पिंजारी व अरुण यांच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले. रहिमोद्दीनचा शोध घेतला असता तो गुजरातमध्ये पळून गेल्याची माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी एलसीबीची चार पथके गुजरात येथे रवाना करण्यात आली.

पथकाने आमलीफळी येथे जावून माहिती घेतली असता नकुल व अरुण हे दोघे नकुलच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. पोलिसांनी चार आरोपींना पकडले मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रहिमोद्दीन फरार होता.

 

रहिमोद्दीनचा शोध घेत असताना तो गुजरातमधील नर्मदा तालुक्यात (Narmada Taluka, Gujarat) असल्याची माहिती मिळाली.
पथाकाने गुजरात येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती दिली.
रहिमोद्दीन याचे आमलीफळी येथील एका महिलेशी विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) होते.
बुल्या वळवी याच्या मुलाने तिला 15 दिवसांपूर्वी पळवून नेले होते. याचा राग मनात धरुन इतर साथिदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींना अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

स्थानिक गुन्हे शाखा व अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी अतिशय क्लिष्ट
व संवेदनशील अशा गुन्ह्याचा अवघ्या 12 तासात छडा लावला.
पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी पथकातील अधिकारी आणि अमंलदार यांचे अभिनंदन केले.

 

ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil), अपर पोलीस अधीक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar),
उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत (Sub Divisional Police Officer Sambhaji Sawant)
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Police Inspector Ravindra Kalamkar),
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील (LCB API Sandeep Patil),
पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी (PSI Anil Gosavi),

पोलीस हवालदार मुकेश तावडे, सजन वाघ, रविंद्र पाडवी, महेंद्र नगराळे, प्रमोद सोनवणे, जितेंद्र तांबोळी, राकेश वसावे,
रमेश ठाकुर, जितेंद्र तोरवणे, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, पोलीस शिपाई विजय ढिवरे, शोएब शेख, राजेंद्र काटके,
अभिमन्यु गावीत, किरण मोरे, दिपक न्हावी, रमेश साळुंके,
अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश गावित (API Rajesh Gavit),
पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर (PSI Dnyaneshwar Badgujar), रितेश राऊत,
महिला पोलीस उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर, पोलीस हवालदार कपिल बोरसे, पोलीस नाईक किशोर वळवी,
खुशाल माळी, गिरीष सांगळे, आदीनाथ गोसावी, प्रदीप वाघ यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar police arrest 5 accused for trying to burn father alive by throwing petrol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tandul Mahotsav Pune 2022 | अजित पवार यांच्याहस्ते तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन ! उपमुख्यमंत्र्यांचे शेतकर्‍यांना आवाहन, म्हणाले – ‘शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा’

 

Sooji Roti Recipe | डायबिटीज कमी ठेवण्यासह शरीरात एनर्जी राखते ‘सूजी’, अशी तयार करा सूजीची चपाती

 

Rohit Pawar | रोहित पवारांकडून पंजाब सरकारच्या माजी मंत्री, आमदारांच्या सुरक्षेबाबतच्या निर्णयाचे स्वागत, महाराष्ट्र सरकारला दिला ‘हा’ सल्ला