सुरत – भुसावळ पॅसेजरमध्ये महिलेची ‘छेड’, नंदुरबार स्थानकावर तुफान ‘दगडफेक’

नंदुरबार : पोलिसनामा ऑनलाईन – सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये महिलेची छेड काढल्याने नंदुरबार रेल्वे स्थानकावर तुफान दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात तणाव पसरला असून पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत-भुसावळ पॅसेजरमध्ये हि रेल्वे नंदुरबार रेल्वे स्टेशनवर आली असता महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून रेल्वेस्टेशन तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या दगडफेकीत ३ पोलीस देखील जखमी झाले. महत्वाची गोष्ट म्हणजे छेडखानी झालेल्या या महिलेने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नसून पोलीस या महिलेचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा तसेच महिलेचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या