Narayan Rane Arrested | नारायण राणे जेवण देखील पुर्ण करू शकले नाहीत, रत्नागिरी पोलिसांनी मधूनच घेतलं ताब्यात; पाहा व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Narayan Rane Arrested | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविरूद्ध केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्या (statement) वरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक (Narayan Rane Arrested) करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांनी (Ratnagiri police) त्यांना अटक केली आहे. न्यूज एजन्सी एएनआयने जारी केलेल्या एका व्हिडिओत पोलीस राणेंना अटक करण्यासाठी गेले तेव्हा, त्याच्या हातात त्यावेळी जेवणाची प्लेट (plate of lunch) दिसत आहे.

राणेंच्या अटकेसाठी गेलेल्या पोलीस पथकाला त्यावेळी राणे समर्थकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. मात्र, पोलीस त्यांना अटक करून घेऊन गेले.
केंद्रीय मंत्री राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हालचाल केली, परंतु मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांची निराशा झाली.
एफआयआर रद्द करणे आणि अटकपूर्व जामीनाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला.

भाजपा नेते प्रमोद जठार (BJP leader Pramod Jathar) यांनी म्हटले की, रत्नागिरीचे एस.पी. नारायण राणे यांना विना वॉरंट अटक करण्यासाठी संमेश्वरमध्ये आले.
जठार यांच्या म्हणण्यानुसार, रत्नागिरीच्या एसपींचे म्हणणे होते की, त्यांच्यावर अटकेसाठी मोठा दबाव आहे आणि त्यांना 5 मिनिटात राणे यांना अटक करण्यास सांगण्यात आले आहे.

 

कोणत्या वक्तव्यावरून झाला वाद?

केंद्रीय मंत्री राणे यांनी रायगड जिल्ह्यात (Raigad district) सोमवारी जन आशीर्वाद यात्रे
(Jan Ashirwad Yatra) दरम्यान म्हटले की, हे लज्जास्पद आहे की,
मुख्यमंत्र्यांना हे माहित नाही की स्वातंत्र्याला किती वर्ष झाली आहेत.
भाषणादरम्यान ते मागे वळून असे विचारताना दिसले होते.
जर मी तिथे असतो तर त्यांच्या जोरदार कानशिलात दिली असती.

राणे यांनी दावा केला आहे की, 15 ऑगस्टला जनतेला संबोधित करताना ठाकरे हे विसरून गेले होते की, स्वातंत्र्याला किती वर्ष पूर्ण झाली आहेत.
त्यांनी म्हटले की, भाषणाच्या दरम्यान ते आपल्या सहकार्‍याला विचारत होते की, स्वातंत्र्याला किती वर्ष झाली.

 

Web Title : Narayan Rane Arrested | narayan rane could not even finish the food ratnagiri police picked it up from the middle see video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Anti Corruption | 40 हजाराची लाच घेणार्‍या पुणे मनपाच्या उप अभियंत्यास पोलिस कोठडी

Business Idea | कमी मेहनतीत ‘या’ व्यवसायातून वार्षिक करा 25 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या कशी करावी सुरूवात?

Narayan Rane Arrested | अटक केल्यानंतर नारायण राणेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…