Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर वादग्रस्त विधानामुळे पुण्यासह नाशिक, महाड मध्ये गुन्हे दाखल, अटक होणार?; नाशिक, पुण्याहून पोलीस पथक चिपळूणला रवाना

पुणे : Narayan Rane | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान वादग्रस्त विधान केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुण्यासह नाशिक, महाड येथे राणे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे व नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामुळे पोलीस राणे यांना अटक करतात की ते अटक टाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नारायण राणे (Narayan Rane) यांची जन आशिर्वाद यात्रेला चिपळूणमधून सुरुवात होत आहे.

पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात  नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे सरचिटणीस रोहित कदम यांनी याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यांचा तपास सुरु करण्यात आला असून रात्री उशिरा पुणे पोलिसांचे एक पथक केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणला रवाना करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. दरम्यान, नाशिक शहरातही नारायण राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली असून नाशिक पोलिसांचे पथकही चिपळूणला रवाना झाले आहे. त्यामुळे आज दिवसभर राजकारणाचे केंद्र बिंदु चिपळूण राहणार आहे.

हे देखील वाचा

IPS Transfer Maharashtra Police | 8 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह राज्यातील 37 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, नवी मुंबई, पिंपरी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांचा समावेश

IPS Transfer | पुणे-पिंपरीतील अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे यांच्या बदल्या; IPS सुधीर हिरेमठ यांना पदोन्नती तर पुण्यात ‘या’ अधिकाऱ्याची नियुक्ती

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  narayan rane in trouble one more case registered mahad pune over controversial statement against cm uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update