Narayan Rane On Bhaskar Jadhav | नारायण राणेंचा भास्कर जाधवांना थेट इशारा, म्हणलो – ”मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक दिवस चोप नक्की देणार”

सिंधुदुर्ग : Narayan Rane On Bhaskar Jadhav | कोण तरी भास्कर जाधव आणला भाडोत्री माझ्यावर टीका करण्यासाठी मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप नक्की देणार, असा थेट इशारा भाजपा राज्यसभा खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे (Shivsena UBT) आमदार भास्कर जाधव यांना दिला आहे. ते सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात बोलत होते. (Sindhudurg News)

नारायण राणे म्हणाले, ज्या भास्कर जाधवला मी बाळासाहेब ठाकरे यांना सांगून आमदारकीचे तिकीट दिले, निवडणुकीसाठी १५ लाख रुपये दिले, त्याचा भास्कर जाधवला विसर पडला आहे. माझ्या जिल्ह्यात येऊन माझ्यावर टीका करतो.

राणे म्हणाले, माझ्याकडे आला, प्रचाराला पैसे नाहीत म्हणाला. विचारले किती लागतील? म्हणाला १० लाख लागतील. एकदा दहा आणि एकदा १५ लाख घेऊन गेला. परत देण्याचीही त्याची दानत नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

भास्कर जाधव यांनी काय म्हटले होते…

कणकवली येथील सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भास्कर जाधव यांनी नारायण राणे
यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, नेपाळी वॉचमनचा मुलगा दम देतो.
ज्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला त्यांना धडा शिकवा, असे जाधव यांनी म्हटले होते.
तसेच भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता कोंबडी चोर असा उल्लेख केला होता,
याच टीकेला राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ तारखेला अमित शाह विदर्भ दौऱ्यावर, तर १९ फेब्रुवारीला PM मोदी मुंबईत