Narayan Rane | ‘शरद पवारांनी चिंता करु नये, लवकरच…’, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नारायण राणेंचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी भागात झालेल्या गोंधळानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे (Maharashtra Politics News) पाहायला मिळत आहे. या गोंधळानंतर एमआयएम (MIM), शिंदे गट आणि भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाने केला होता. तर या आरोपांना शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपने (BJP) प्रत्युत्तर दिले आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली होती. शरद पवारांच्या विधानावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी चिंता करु नये, त्यांना अभिप्रेत असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल, असे मोठे विधान नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

छत्रपती संभाजीनगरनंतर मुंबईतील मालवणी भागातही काही प्रसंग घडला. यावरुन या दोन्ही ठिकाणी राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली आहे. दोन्ही घटनेला धार्मिक स्वरुप आहे का असे वाटायला लागले आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावर नारायण राणे यांनी पवारांनी चिंता व्यक्त करु नये असे म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

 

…तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते

बोलताना संयम बाळगला पाहिजे, कोणाचीही मने दुखवली जातील असे बोलू नये, असे मला वाटते. पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकार त्यांचे राहिलेले नाही. त्यांचे सरकार असताना लोकांना जास्त चिंतेत टाकले होते. चिंताग्रस्त लोक होती. करण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोण होते? तर ते मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, असा टोला नारायण राणे (Narayan Rane) यांनी लगावला.

मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला

निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन नारायण राणे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राणे म्हणाले, गेले अनेक वर्ष मी कोकणाला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न केला. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यांच्या तुलनेत कोकण प्रगत झाला. आजचा विषय आंब्याच्या ब्रँडिंगचा आहे. आजकाल कृषी विद्यापीठ (Agricultural University) आहेत. परंतु आंबा कसा पिकवावा, बायप्रॉडक्ट कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात नसल्याची खंत राणे यांनी बोलून दाखवली.

 

Web Title :- Narayan Rane | union minister and bjp narayan rane replied ncp chief sharad pawar statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Trupti Kolte Patil | हवेलीच्या तत्कालीन तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना ‘मॅट’चा दिलासा,
निलंबनाची कारवाई रद्द करुन दिले ‘हे’ आदेश

Maharashtra Politics News | ‘गडाख आणि दोन अपक्ष आमदारांकडून किती खोके घेऊन मंत्रीपद दिलं?, जाहीर सभेत सांगा’,
शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना आव्हान!

Pune Crime News | व्यावसायिकांना लुबाडणार्‍या वकिलावर बलात्काराचा गुन्हा दाखल