नारायण राणेंच्या ‘निलेश फार्म’ हाऊसच्या कंपाऊंडची भिंत तोडली

रायगड :पोलीसनामा ऑनलाईन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कर्नाळा येथील फार्म हाऊसवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मुंबई-गोवा हायवेच्या रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या फार्म हाऊसच्या कंपाऊंडची भिंत तोडण्यात आली आहे. या फार्म हाऊसमधील सुमारे 21 गुंठे जमीन ही मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’77d6a9ac-cadd-11e8-a4dd-8f8f3d44e67d’]

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर असलेल्या ‘निलेश फार्म’ या फार्म हाऊसच्या कंपाऊंडची भिंत कारवाईत पाडण्यात आली.चौपदरीकरणाच्या भूसंपदनामध्ये तारा गावातील गावकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असून त्यांना मोबदला देण्यात आला. परंतु शासनामार्फत दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. स्थानिक गावकऱ्यांची घरं ही तातडीने संपादित करण्यात आली असून राजकीय पुढाऱ्यांना मात्र यावेळी अभय देण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.

छोट्या जागेला मोठी किंमत तर मोठ्या जागेला कमी किंमत देण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाने संपादित केलेल्या घरं आणि जागेचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली होती.

दोन वर्षांपूर्वी तोडण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या घरांच्या वेळेस नारायण राणे यांच्या जागेचं संपादन का करण्यात आलं नाही? त्यांच्यावर विशेष मेहेरबानी का करण्यात आली? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.

नारायण राणे यांच्या 21 गुंठे जमीन, झाडं, पत्राशेड आणि कंपाऊंडच्या मोबदल्यात सुमारे 1 कोटी 32 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आल्याची माहिती आहे.

[amazon_link asins=’B072XP1QB7,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d18509b3-cadd-11e8-a2db-c1fde78c097c’]

 

नागपूर येथे आज बंजारा मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते . या मेळाव्यात बोलताना  केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयीच्या काही बाबी सांगितल्या . “मुख्यमंत्र्यांचे वडील राजकारणात होते. मात्र त्यांनी मुलाला राजकारणात आणलं नाही. तर आम्ही त्यांच्या वडिलांना विनंती करुन देवेंद्र यांना राजकारणात आणलं, असे  नितीन गडकरी यांनी मेळाव्यात बोलताना  सांगितले .
मी आणि मुख्यमंत्री घराणेशाहीपासून दूर आहोत, राजकारणात येण्याआधी अनेकजण समाजाच्या विकासाच्या गोष्टी करतात. पण एकदा निवडून आले की बहुतेकजण समाजाला विसरतात. मग घराणेशाही सुरु होते, असं गडकरी म्हणाले.
मात्र या सगळ्या घराणेशाहीपासून मी आणि मुख्यमंत्री दूर आहोत. कारण त्यांची मुलगी लहान आहे आणि माझ्या कुटुंबात कोणीही राजकारणात येण्यास इच्छुक नाही, असं गडकरींनी नमूद केलं. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या गोर बंजारा मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून बंजारा बांधव उपस्थित होते.