Narayangaon Bypass | पुणेकरांसह नाशिककरांसाठी खुशखबर ! नारायणगाव बायपासचं काम पूर्ण; पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास होणार वेगवान

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –   अनेक वर्षांपासून सुरु असलेले पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील (Pune-Nashik National Highway) काम आता पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी दिली आहे. पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथील बायपासचे (narayangaon bypass) काम पूर्ण झाल्याने आता वाहतुक जाण्यायेण्यास सोईस्कर झाली आहे. तसेच हा प्रवास वेगवान देखील होणार आहे. तर कृषी उत्पादने मुंबई-पुणे मार्केटमध्ये (Mumbai-Pune Market) सहज पोहोचतील, असं म्हणत नितीन गडकरी यांनी नारायणगाव येथील बायपासचे (narayangaon bypass) काम पूर्ण झालेले फोटो देखील ट्विटच्या माध्यमातून पोस्ट केले आहेत.

पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नारायणगाव येथील बायपासचे काम गेली 5 वर्षांपासून सुरु होतं. 5 किलोमीटर लांब आणि 60 मीटर रुंदीच्या बाह्यवळण रस्त्याचे काम 2018 रोजी भूसंपादनाच्या कारणामुळे रखडले होते. यांनतर आता या बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झालं आहे. यामुळे मार्गावरील वाहतूक कोंडीतून आता नागरिकांची सुटका झाली आहे. म्हणून आता पुणे-नाशिक महामार्गावरील प्रवास (Travel) वेगवान होणार आहे.

Web Title : Narayangaon Bypass | narayangaon bypass work completed pune nashik pune journey will be faster nitin gadkari

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Sharad Pawar and PM Narendra Modi | पीएम मोदी आणि शरद पवारांची दिल्लीत तासभर चर्चा, तर्क-वितर्कांना उधाण

Sachin Pilot | गेल्या 6 महिन्यात पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, काँग्रेसचा भाजपवर निशाणा

Suspension | नगर जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांचे तडकाफडकी निलंबन; SP मनोज पाटील यांची कारवाई