डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनचे साधक म्हणून ‘त्यांनी’ दिला हत्यारं नष्ट करण्याचा ‘सल्ला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. पुनाळेकर यांनी संशयित आरोपींना वकिल म्हणून नाही तर सनातनचे साधक म्हणून दिला आहे. असा युक्तीवाद सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात केला.

विशेष सत्र न्यायालयात पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. प्रकाश सुर्यवंशी यांनी हा युक्तीवाद केला. पुढील सुनावणी १९ जून रोजी होणार आहे.

एका साधकाने दुसऱ्या साधकाला दिला सल्ला

कर्नाटक एसआयटीने दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरचा जबाब नोंदविला आहे. त्यात पुनाळेकर यांनी पुर्ण शस्त्र नष्ट न करता त्याचे सुटे भाग करून ठाणे येथील खाडीत फेकून देण्याचा सल्ला दिला असल्याचे म्हटले आहे. पुनाळेकर यांनी वकिली क्षेत्राची लक्ष्मणरेषा ओलांडून एक साधक म्हणून दुसऱ्या साधकाला गुन्ह्यातील शस्त्रे नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते उर्वरित सुटे भाग दुसऱ्या गुन्ह्यात वापरायचे होते का असा सवाल अड. सुर्यवंशी यांनी उपस्थित केला.

तुमचा दुसरा गांधी करू या धमकीकडे वेधले लक्ष

तुमचा दुसरा गांधी करू अशी धमकी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना देण्यात आली होती. याकडे अ‍ॅड. सुर्यवंशी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांना मारण्यासाठी आरोपींनी संगनमताने मोठा कट रचून तो पुर्णत्वास नेल्यानेच गुन्हा दाखल केला असल्याचे ते म्हणाले.

आरोग्यविषयक वृत्त –

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा 

Loading...
You might also like