मोदी २.० सरकारच्या कार्यकाळात झपाट्याने वाढतेय ‘इंडियन आर्मी’ची ‘ताकद’, ५० दिवसात ८५०० कोटींच्या ‘अत्याधुनिक’ शस्त्रांची खरेदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतीय सेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्या दुसरा कार्यकाळ सुरु झाल्यानंतर ५० दिवसांच्या आत सरकारने लष्करासाठी ८ हजार ५०० कोटी रुपयांची शस्त्रखरेदी केली आहे. त्याचबरोबर अनेक करार हे तयार करण्याचे काम चालू असून लवकरच आणखी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाणार आहे.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर भारतीय सैन्याला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रांची गरज भासणार आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने लष्कराला शस्त्र खरेदी करण्याचे तात्पुरते अधिकार दिले होते. त्यानंतर लष्कराने अनेक करार केले आहेत. या नवीन व्यवहारांमध्ये स्पाइक एंटी-टॅंक गाइडेड मिसाइल, आर -७३ आणि आर -७७ एअर टू एअर मिसाइल्स त्याचबरोबर स्पाइस २००० एयर टू ग्राउंड स्टॅन्ड ऑफ सह विविध प्रकारच्या दारुगोळ्याची देखील खरेदी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरंक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या संदर्भात एक समीक्षा बैठक घेतली होती. यामध्ये लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्यावर चर्चा झाली होती.

११४ मल्टीरोल लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना

या करारांबरोबरच लवकरच सरकार लष्करासाठी ११४ मल्टीरोल लढाऊ विमान खरेदी करण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहॆ. यासाठी जवळपास १५ बिलियन डॉलर खर्च केले जाणार आहेत. यासाठी अमेरिकेच्या बोइंग आणि लॉकहीड मार्टिन, स्वीडनच्या साब, फ्रांसच्या डसॉल्ट सह विविध कंपन्यांनी रस दाखवला आहे. मिग-२१ हे लढाऊ विमान आता जुने झाल्यामुळे भारतीय लष्कर या नवीन लढाऊ विमानांची योजना आखली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –