खुशखबर ! कार-दुचाकी सारखं आता बुक करा ट्रॅक्टर, शेतकर्‍यांसाठी मोदी सरकारची नवी स्कीम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनेक मोठं मोठी उपकरणे भाड्याने मिळणार आहेत. यासाठी सरकार स्वतः मद्यस्थी करणार आहे. कृषी मंत्रालयाने यासंबंधीचे एक ऍप लॉंच केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठीची उपकरणे भाड्याने मिळणार आहेत. हे ऍप १२ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ऑनलाइन कारप्रमाणे आता शेतीसाठी बुक करू शकता ट्रॅक्टर
शेती बाबतची सर्व उपकरणे भाड्याने दिली जातील यासाठी संपूर्ण देशात ३५ हजार कस्टम हायरिंग सेंटर उभारण्यात आले आहेत. ज्याची क्षमता २.५ लाखांपर्यंत उपकरणे देण्याची आहेत.

CHC Farm Machinery असे याचे नाव असून प्ले स्टोअर वरती हे इंग्रजी,हिंदी, उर्दू समवेत अन्य १२ भाषांमध्ये उपलब्ध आहेत.



या प्रकारे घेऊ शकता सबसीडी

1) जर शेतकऱ्याने उपकरणाचे संपूर्ण भाडे दिले तर शेतकरी सबसीडीचे पैसे आपल्या खात्यात जमा करून घेऊ शकतो.

2) दुकानदाराला सबसीडी द्यायची असेल तर तसे लिखित स्वरूपात द्यावे लागेल त्यानंतर सबसीडी दुकानदाराकडे जमा होईल.

3) शेतकऱ्यांच्या आणि दुकानदारांच्या सहमतीने सबसीडीचे पैसे थेट कृषी उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या खात्यात जाऊ शकते.

4) पोर्टलवर सध्या कोणते उपकरण कितीला भाड्याने मिळणार याबाबत माहिती उपलब्ध नाही लवकरच ती माहिती अपडेट होईल.

शेतकरी अशा प्रकारे करू शकतात अर्ज – एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या उपकरणांवरती जर सूट हवी असेल तर त्याला सीएससी (कॉमन सर्विस सेंटर) वर अर्ज करणे गरजेचे आहे. इथे जाऊन शेतकरी सीएससी संचालक यांना आपल्याला हवे असलेले उपकरण सांगू शकतो. त्यानंतर शेतकऱ्यांना एग्री मशीनरी. इन पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागेल.

Visit : policenama.com