म्हणून दुसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी निवडले पहिल्यांदा ‘मालदीव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मालदीवला पोहचले. दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. नरेंद्र मोदी यांनी पहिल्या विदेश दौऱ्यासाठी मालदीव या देशाचीच निवड का केली?

मोदींचे ‘नेबर फर्स्ट’ पॉलिसी

मालदीवच्या दौऱ्यावर जाण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दुसरी वेळ आहे. या आधी गेल्यावर्षी मालदीवचे राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहण समारंभात नरेंद्र मोदी मालदीवला गेले होते. मोदी सरकारची ‘नेबर फर्स्ट’ म्हणजे शेजारी देशांना प्राधान्य अशी पॉलिसी राहिली आहे. २०१४ च्या वेळी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भुटानचा दौरा केला होता.

पाक – चीनला कमकुवत करण्यासाठी मालदीव गरजेचे

संरक्षण आणि इतर धोरणांसाठी मालदीव देश गरजेचा आहे. दक्षिण आशियामध्ये असलेल्या देशांमध्ये भारतासाठी सगळ्यात जास्त विश्वास ठेवण्याजोगा देश हा मालदीव आहे. भारत मालदीवला सोबत घेऊन हिंद महासागरात नवीन रणनिती तयार करू इच्छितोय. जर भारताला मजबूत व्हायचे असेल तर मालदीवची साथ गरजेची आहे. जर मालदीवला सोबत घेऊन चीन मजबूत झाला तर भारत कमकुवत होईल. पण भारत त्या ठिकाणी मजबूत झाला तर पाकिस्तान आणि चीन दोन्ही देश कमकुवत होतील.

चीनचा आर्थिक परिणाम कमी करण्याचा प्रयत्न

दक्षिण आशियातील देशांना चीन आर्थिक मदतीच्या नावावर कर्जाच्या ओझ्यात ढकलत आहे. पाकिस्तान आणि मालदीव या देशांवर देखील याचा परिणाम झाला आहे. चीनचा वन बिल्ट वन रोड प्रकल्प मालदीवच्या मारू आणि श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरातून जाईल. या माध्यमातून चीन भारताला घेरण्याची तयारी करत आहे. यांमुळे भारतासाठी मालदीव गरजेचे आहे. जर भारत मालदीवला आर्थिक मदत करेल तर मालदीव भारतासोबत येईल.

पाक-चीन -मालदीव हा त्रिकोण तोडणे भारताच्या फायद्याचे

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मालदीव भारतासाठी किती गरजेचा आहे? फेब्रुवारी २०१८ मध्ये जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती अब्दुयांचा ल्ला यामिन यांनी आणीबाणी लागू केली होती तेव्हा भारत मालदिवच्या मदतीसाठी पुढे आला होता. भारताने मालदीवच्या सैन्यासाठी मदत करण्याची तयारी केली होती.

मालदीव चीन आणि पाकिस्तान यांचा त्रिकोण तयार झाला आहे, जो भारतासाठी धोकादायक आहे. जर भारत या त्रिकोणाला तोडण्यास यशस्वी ठरल्यास भारतासाठी ते मोठे यश असेल. मोदी भारताच्या दौऱ्यावर गेल्यामुळे मालदीवच्या नागरिकांमध्ये भारताबद्दल विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.