शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याकरिता सरकारनं 18 भाषांमध्ये लाँच केलं एक विशेष चॅनेल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) सहकारी कॉप ट्यूब चॅनेल लाँच केला. एनसीडीसीकडून सांगण्यात आले की, त्यांनी वनस्टॉप चॅनेल म्हणून इंटरनेटवर हे चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून हिंदी तसेच 18 राज्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित केले जातील. तोमर यांनी प्रसंगी राज्यांसाठी ‘सहकारी संस्थांची स्थापना व नोंदणी’ चे मार्गदर्शक व्हिडिओही प्रसिद्ध केले.

तोमर यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले कि, एनसीडीसीच्या प्रयत्नांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केल्या जाणाऱ्या इको-सिस्टम / रिफार्म्सचा हा एक भाग आहे. त्यांनी लिहिले की, मोदी जींचे स्वप्ने साकार करण्यात सहकारी क्षेत्राचा मोठा वाटा आहे आणि निश्चितच मोठे योगदान आहे. सहकारी क्षेत्राने भारतात दीर्घ प्रवास केला आहे आणि शेतकर्‍यांच्या परिस्थिती आणि आर्थिक विकासामध्ये त्याचे यश सिद्ध केले आहे. लहान व सीमांतिक शेतकरी आणि ग्रामीण गरीब लोकांचे एक संघटन म्हणून या सहकारी संस्थेने 29 कोटी सभासद आणि 8.50 लाखाहून अधिक संस्थांचे जाळे तयार केले आहे. एनसीडीसीच्या सहकार कॉपट्यूब वाहिनीचे उद्घाटन व राज्यांसाठी सहकारी संस्थांची स्थापना व नोंदणी मार्गदर्शक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला.

या भाषांत असतील हे चॅनेल
चॅनेल हिंदी आणि 18 राज्यांच्या (यू.पी., उत्तराखंड, एम.पी., बिहार, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, हिमाचल, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, ओडिशा, मिझोरम, त्रिपुरा, केरळ, गुजरात, पंजाब आणि कर्नाटक ) प्रादेशिक भाषांमध्ये राहील.