Naresh Mhaske | नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट, आव्हाडांना विरोध करू नका, आदित्य ठाकरेंनी दिला होता दम

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Naresh Mhaske | शिंदे गटाच्या (Shinde Group) हिंदुगर्वगर्जना यात्रेत ठाकरे कुटुंबियांवर सातत्याने आरोप करण्याचे सत्र अवलंबण्यात आले आहे. आता ठाण्यातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी थेट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप केला आहे. कळवा परिसरात शिवसेना (Shivsena) वाढावी म्हणून मी प्रयत्न करत होतो. मात्र, त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांना विरोध करू नका, असा दम दिला होता, असा गौप्यस्फोट म्हस्के यांनी केला आहे.

 

म्हस्के (Naresh Mhaske) भाषणात म्हणाले की, कळवा परिसरातून महापालिका निवडणुकीत (Municipal Elections) शिवसेनेचे जास्तीतजास्त नगरसेवक (Corporator) निवडून यावे याकरिता मी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (MP Dr. Shrikant Shinde) प्रयत्न करत होतो. त्याकरिता आम्ही मेळावे घेतले. मात्र, त्याचवेळी आमचे छोटे सरकार अर्थात आदित्य ठाकरे यांनी मला फोन करून आव्हाड यांना विरोध करू नका, असा दम दिला होता.

 

म्हस्क पुढे म्हणाले, एकीकडे महापालिकेच्या कामकाजात, महासभेत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सातत्याने आम्हाला विरोध करत होती. असे असताना दुसरीकडे आव्हाड यांना विरोध नको, अशी आदित्य यांची भूमिका होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनाविरोधी भूमिका घेत असताना आम्ही मूग गिळून गप्प का बसायचे, असा प्रश्न मला पडला होता.

 

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) पूर्वतयारीबाबत म्हस्क म्हणाले,
बीकेसी येथील दसरा मेळाव्याकरिता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांच्या बालेकिल्ल्यातून 30 हजार शिवसैनिक (Shiv Sainik) घेऊन जाण्याचे लक्ष्य आहे.
त्यासंदर्भात नगरसेवकांनाही सूचना दिल्या आहेत.

 

Web Title :- Naresh Mhaske | dont resist ncp jitendra awhad shivsena aditya thackeray warns naresh mhaske thane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

S. Jaishankar | युद्धात भारत कोणाच्या बाजूने?, संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एस. जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर

IND vs ENG | भारताच्या दीप्ती शर्माने चेंडू न टाकताच घेतली विकेट

CM Eknath Shinde | ते बंड फसले कारण त्यावेळी अजित पवार होते, यावेळी…, एकनाथ शिंदे यांनी सांगितला फरक