‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी ‘या’ अभिनेत्याची वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन – अभिनेते अनुपम खेर यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षपदाची धुरा कोण सांभाळेल याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान या पदाकरिता अध्यक्षपदासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे.
का दिला अनुपम खेर यांनी राजीनामा 
गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. पदभार स्विकारल्याच्या वर्षभरातच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण खेर यांनी यावेळी दिलं. खेर यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपाच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता.

‘त्या’ काॅफी शाॅप मधील ‘भानगडी’ थांबता थांबेनात…! काॅफी सोडून चाललंय सर्व काही

याआधी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना अध्यक्षपदासाठी दोनदा विचारण्यात आलं होतं. मात्र त्यांनी ते नाकारलं. त्यामुळे आता नसिरुद्दीन शाह यांचा विचार सुरू आहे. संस्थेचे ते माजी विद्यार्थी असल्याने तिथल्या वातावरणाशी परिचित आहेत. त्याचप्रमाणे त्यांची परखड भूमिका, विद्यार्थ्यांशी असलेलं जवळचं नातं या गोष्टींमुळे ते या पदासाठी योग्य निवड ठरतील असं म्हटलं जात आहे. मात्र कोणत्याही शासकीय नोकरीपासून स्वत:ला लांब ठेवणारे नसिरुद्दीन शाह एफटीआयआयचं पद स्वीकारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नसिरुद्दीन शाह यांच्याविषयी थोडे 
बॉलिवूडचा एक अप्रतिम अभिनय करणारा कलाकार म्हणून जेष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह  यांचे नाव पुढे येते. १९७५ पासून ते आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयातून एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मधून अभिनयाचे धडे घेतले. नायकाची ,खलनायकाची किंवा कोणत्याही प्रकारची भूमिका असो ते यशस्वीपणे वठवण्यात नसिरुद्दीन शाह यांचा हातखंडा आहे.
त्यांचे गाजलेले सिनेमे 
डर्टी पॉलिटिक्स, फाइंडिंग फन्नी, डेढ़ इश्किया, डर्टी  पिक्चर, ज़िन्दगी  न  मिलेगी  दोबारा, ७ खून माफ़, राजनीति, इश्किया, पीपली  लाइव, गर्ल इन येलो बूट्स, डर्टी पिक्चर, ओमकारा, इकबाल, मैं मेरी पत्नी और वो, मकबूल, सरफ़रोश, चाइना गेट, कभी हाँ कभी ना, विश्वात्मा, त्रिदेव, हीरो हीरालाल, आक्रोश, अलबर्ट पिन्टो को गुस्सा क्यों आता है, हम पाँच, सूरज, स्पर्श, निशांत, उमराव जान

जाहिरात