‘या’ कारणांमुळं क्रिकेटचा ड्रेस घालून चित्रपट पाहण्यासाठी जायचे नसीरूद्दीन शाह !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सागितला आहे. त्यांनी सांगितलं आहे की सिनेमा पाहण्यासाठी ते कसे विचित्र पेहराव करत असत.

एका मुलाखतीत बोलताना नसीरूद्दीन शाह म्हणाले, “माझे वडिल अँग्लोफाईल होते. म्हणजेच ब्रिटन आणि ब्रिटीश कल्चर त्यांना खूप आवडायचं. मला इंग्रजी सिनेमे पाहण्यासाठी परवानगी असायची परंतु हिंदी सिनेमा पाहण्यासाठी नाही. मला दारा सिंह यांचे सिनेमे आणि त्यांना पाहण्याची खूप इच्छा असे. हेच कारण होतं की, मी मला असा तयार करायचो की, जसं काही मी क्रिकेट मॅच पाहण्यासाठी जात आहे.

‘माझ्या वडिलांना मनातून आवडायचे दिलीप कुमार यांचे सिनेमे’

शाह पुढे म्हणाले, “मी नखशिखान्त एका व्हाईट ड्रेसमध्ये असायचो. फक्त क्रिकेट पॅड्स आणि ग्वल्सचीच कमी होती. मी थिएटरमध्ये जायचो. यामुळं कोणाला संशय येत नसे की, मी सिनेमा पाहण्यासाठी जात आहे. परंतु माझे वडिल दिलीप कुमार यांच्या सिनेमाबद्दल काही नव्हते म्हणत. मला वाटतं की, मनातून कुठे ना कुठे ते दिलीप कुमार यांना पसंत करत होते. मलाही दिलीप कुमार आणि दारा सिंह खूप आवडायचे.” असं ते सांगतात.