Nashik ACB Trap | 1800 रुपये लाच घेताना नाशिक मनपाच्या प्रभारी कार्यालय अधीक्षक व शिपाई अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – चहाच्या टपरीचे नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) हॉकर्स झोनमध्ये बायोमेट्रिक नोंदणी करुन देऊन व पावती सुरु करून दिल्याच्या मोबदल्यात 1800 रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) नाशिक मनपाच्या जाहिरात व परवाना विभागाच्या विभागीय कार्य़ालयातील लिपीक तथा प्रभारी कार्यालय अधीक्षक आणि शिपायाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik ACB Trap) रंगेहात पकडले. नाशिक एसीबीच्या (Nashik ACB Trap) पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.6) महापालिकेच्या मुख्य गेट जवळील पार्किंगमध्ये केली.

 

लिपिक तथा प्रभारी कार्यालय अधीक्षक राजू उत्तम वाघ (वय-48), शिपाई प्रवीण अर्जुन इंगळे (वय -42) अशी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 29 वर्षाच्या व्यक्तीने नाशिक एसीबीकडे (Nashik ACB Trap) शुक्रवारी तक्रार केली आहे.

 

तक्रारदार यांच्या चहा टपरीचे नाशिक महानगरपालिका हॉकर्स झोन (Hawkers Zone) मध्ये बायोमेट्रिक नोंदणी करून देऊन व पावती सुरू करून देण्याच्या मोबदल्यात राजू वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोड अंती 1800 रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांनी नाशिक एसीबीकडे याबाबत तक्रार केली.

नाशिक एसीबीने पंचासमक्ष पडताळणी केली असता राजू वाघ यांनी 5 हजार रुपये
लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 1800 रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
पथकाने सापळा रचला. राजू वाघ यांच्या सांगण्यावरून शिपाई प्रवीण इंगळे
यांनी नाशिक महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन या कार्यालयाच्या मुख्य गेट
जवळील पार्किंगमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक अनिल बागुल (Police Inspector Anil Bagul) पोलीस अंमलदार किरण अहिरराव,
राजेंद्र गीते, चालक संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Nashik ACB Trap | Office Superintendent and constable in charge of Nashik Municipality caught in anti-corruption net while taking Rs 1800 bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Sanjay Raut | ‘भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कधीच प्रेम नव्हत’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

Chhagan Bhujbal | ‘माझा डोळा विरोधी पक्ष पदावर नाही तर…’, बावनकुळेंच्या टीकेला छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Pune Crime News | पुण्यात कोयते उगारून दहशत निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई – पोलिस आयुक्त रितेश कुमार (Video)