Nashik Crime Branch | नाशिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून तडीपार गुंडाला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime Branch | नाशिक शहर, जिल्ह्यातून तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने म्हसरुळ लिंकरोड परिसरातून अटक केली आहे. रितेश भाऊसाहेब चव्हाण (वय 23 रा. वज्रमुद्रा अपार्टमेंट, सप्तरंग सोसायटीमागे, पेठरोड, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. (Tadipar Criminal Arrest)

गुन्हे शाखेच्या विशेष शाखेचे अंमलदार दत्तात्रय चकोर, गणेश वडजे यांना तडीपार गुंड म्हसरुळ लिंक रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने राऊ हॉटेलच्या मागे असलेल्या चाणक्यपुरी सोसायटी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीवर तडीपारी आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगीरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव,
सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सिताराम कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक
पंकज भालेराव, पोलीस हवालदार किशोर रोकडे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, पोलीस नाईक दत्तात्रेय चकोर,
भुषण सोनवणे, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, स्वप्नील मुंद्रे, गणेश वडजे, भगवान जाधव, चंद्रकांत बागडे
यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC News | भोगवटा पत्र मिळताच नवीन मिळकत येणार ‘करा’च्या कक्षेत ! बांधकाम विभाग, महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाची माहितीही होणार शेअर

पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune PMC News | …तोपर्यंत देवाची उरूळी येथील बायोमायनिंगचे काम सुरू करा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार