Nashik Crime | अपहरण झालेल्या प्रसिद्ध उद्योगपतीचा मृतदेह कालव्यात सापडला, हत्या झाल्याचे स्पष्ट, नाशिक हादरले!

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime | शहरातील एका प्रसिद्ध उद्योगपतीचे (Businessman) त्याच्या कारखान्यातून अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. पोलिसांचा शोध सुरू असताना या उद्योगपतीचा मृतदेह मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील कालव्यात सापडला. मृत उद्योगपतीचे नाव शिरिष गुलाबराव सोनवणे Shirish Gulabrao Sonwane (56, रा. के. जे. मेहता हायस्कुलजवळ, नाशिकरोड) असून त्यांचा नाशिकमध्ये (Nashik Crime) एकलहरे रोडवर शाळेचे बेंच बनविणाचा स्वस्तिक कारखाना (Swastik Factory) आहे (Nashik Businessman shirish sonavane Murder).

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सोनवणे यांच्या शरिरावर गंभीर जखमा होत्या. शिरिष गुलाबराव सोनवणे हे शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कारखान्यात असताना एका स्विफ्ट कारमधून (Swift Car) आलेल्या तीन व्यक्तींपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख (Feroze Latif Shaikh) याला मालकांना ऑर्डर द्यायची आहे, मी अपंग असल्याने त्यांना गाडी जवळ बोलव असे सांगितले. यानंतर सोनवणे आले आणि बोलण्यासाठी गाडीत बसले. (Nashik Crime)

 

दरम्यान, फिरोजला चहा आणण्यासाठी पाठवण्यात आले. तो चहा घेऊन आला असता स्विफ्ट कार आणि सोनवणे गायब होते. बराच वेळ होऊनही मालक परतले नाहीत. तसेच गाडी सिन्नरफाटाच्या दिशेने गेल्याचे काही कामगारांनी सांगितले. दरम्यान, सोनवणे यांच्या पत्नीचा कारखान्यात फोन आला. सोनवणे यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून त्यांनी विचारणा केली. यावेळी कामागाराने सर्व प्रकार सांगितला. यानंतर सर्वत्र शोधाशोध करून शनिवारी (दि.10) नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) सोनवणे बेपत्ता (Missing) झाल्याची तक्रार देण्यात आली.

नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे (Senior Police Inspector Anil Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथकांनी तपास सुरू केला असता मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे शिवारातील पाटबंधारे कालव्यात सोनवणे यांचा मृतदेह (Dead Body) मिळून आला. नातेवाईकांनी सोनवणे यांचा मृतदेह ओळखला. दरम्यान, स्वस्तिक फर्निचर कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेरे हे अनेक दिवसांपासून बंद असल्याचे समजते. (Nashik Crime)

 

सोनवणे हे पूर्वी धुळे येथे रेल्वेत नोकरी करत होते त्यांच्या भावाचा तेथे बेंच बनविण्याचा व्यवसाय होता.
सोनवणे यांची नाशिकरोड रेल्वे स्थानकात बदली झाल्यानंतर त्यांनी नाशकात या व्यवसायाला सुरवात केली.
व्यवसायात जम बसल्यावर त्यांनी नोकरी सोडली. त्यांचा मुलगा आणि सून अमेरिकेत आहे, तर मुलगी डॉक्टर आहे.
हत्येप्रकरणी नातेवाईक तसेच कारखान्यातील कामगारांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
सोनवणे यांची हत्या नेमकी कोणी व का केली, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Web Title :- Nashik Crime | businessman shirish sonavne found dead in
canal after next day of missing nashik crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा