Bindass Kavya | ’बिनधास्त काव्या’ अचानक झाली गायब, पोलिसांची उडाली धावपळ, अखेर सापडली मध्य प्रदेशात, जाणून घ्या प्रकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – 16 वर्षीय प्रसिद्ध यू-ट्युबर ’बिनधास्त काव्या’ (Bindass Kavya) ही कुटुंबिय रागावले म्हणून शुक्रवारी दुपारी अचानक घर सोडून निघून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली. अखेर तिला मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इटारसी रेल्वे स्थानकात (Itarsi Railway Station) खुशीनगर एक्स्प्रेसमधून (Khushinagar Express) ताब्यात घेण्यात आले. ती औरंगाबादची (Aurangabad) असून तिला शहरात आणण्यात येत आहे. तिचे यू-ट्युबवर (Famous YouTuber) साडेचार मिलियनपेक्षा जास्त, तर इन्स्टाग्रामवर (Instagram) 1 मिलिअन फॉलोअर्स (Followers) आहेत. (Bindass Kavya)

 

याबाबत छावणीचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे (Police Inspector Sharad Ingle) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार तिचे वडील सूरज हरिलाल यादव Suraj Harilal Yadav (37, रा. पडेगाव) यांनी छावणी पोलिसांत (Chawani Police Station) शुक्रवारी रात्री दिली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता (CP Dr. Nikhil Gupta) यांनी पहाटे उशिरापर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीत (Ganapati Immersion Procession) पोलीस दल व्यस्त असतानाही तपास यंत्रणा राबवली.

 

दरम्यान, रेल्वे सुरक्षा बलाच्या Railway Security Force (आरपीएफ) मदतीने काव्याचा शोध घेण्यात औरंगाबाद शहर पोलिसांना (Aurangabad City Police) यश आले. ही मुलगी अकरावीत देवगिरी महाविद्यालयात (Devgiri College) शिकते. शुक्रवारी दुपारी ती घरातून न सांगता निघून गेली होती. सोशल मीडियावर ‘बिनधास्त काव्या’ (Bindass Kavya) नावाने ती प्रसिद्ध आहे.

‘बिनधास्त काव्या’च्याच यू-ट्युब चॅनलवरून तिच्या पालकांनी तिला
शोधण्यासाठी मदतीचे आवाहन करत 4 तासांचा व्हिडिओ केला.
ती यूट्युबवर, खेड्यातील एक दिवस, चुलीवरचे जेवण,
कॉलेजमधला पहिला दिवस किंवा पर्यटक म्हणून विविध शहरांमध्ये फिरत असते.
तिचे हे व्हिडिओ लोकांना आवडतात.

 

Web Title :- Bindass Kavya | famous youtuber bindass kavya displeased reached to itarsi what happened

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा