Sushma Andhare On Navneet Rana | गणपतीची मूर्ती तलावात फेकणार्‍या नवनीत राणांवर शिवसेनेच्या सुषमा अंधारे संतापल्या, म्हणाल्या…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare On Navneet Rana | खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) या दाम्पत्याने घरच्या गणपतीचे विसर्जन (Ganesha Immersion) करताना गणेशमूर्ती वाईट पद्धतीने अस्वच्छ, गढूळ पाणी असलेल्या तलावात फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच प्रकरणावरून पुण्यातील शिवसेनेच्या (Shivsena) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. काल आपण ज्या पद्धतीने श्रींचे विसर्जन केले तो कहरच केला आहे. विसर्जनाची साधी पद्धत आणि संस्कार तुम्हाला माहीत असू नयेत आणि तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता, असे खडेबोल अंधारे यांनी नवनीत राणा (Sushma Andhare On Navneet Rana) यांना सुनावले.

 

 

 

सुषमा अंधारे यांनी खासदार नवनीत राणा (Sushma Andhare On Navneet Rana) यांना सुनावताना म्हटले की, नवनीत राणा तुम्ही सतत धर्माच्या नावावर अवडंबर माजवता. तुम्हाला आरसा दाखवण्याची गरज आहे. आम्ही सयंत आणि संयमी भाषेत वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्यासारखे उर बडवून आक्रस्ताळेपणाने बोलत नाही, याचा अर्थ आम्हाला धर्म कळत नाही असा अजिबात होत नाही.

अंधारे म्हणाल्या, फक्त फरक इतकाच की आम्हाला वाटते धर्म हा माणसाचे सौख्य, समृद्धी आणि त्याची मानसिक उमेद कायम करण्यासाठी असतो. धर्माच्या नावावर माणसाची कोंडी करून त्याचे जगणे मुश्किल करण्यासाठी नसतो. नवनीतजी तुम्ही हनुमान चालीसासाठी (Hanuman Chalisa) थयथयाट केला परंतु तुम्हाला साधी हनुमान चालीसाही म्हणता येत नाही. हनुमानाला हनुमान का म्हणतात याचेही नेमके कारण तुम्हाला सांगता येत नाही. इतकेच नाही तर काल आपण ज्या पद्धतीने श्रींचे विसर्जन केले तो कहरच केला आहे. विसर्जनाची साधी पद्धत आणि संस्कार तुम्हाला माहीत असू नयेत आणि तुम्ही स्वतःला हिंदू म्हणवता?

 

नवनीत राणा यांना सुनावताना अंधारे पुढे म्हणाल्या की, एखाद्या धर्मात काय पद्धतीने पूजाअर्चा केली जाते? त्याला कुठल्या अधिष्ठानमध्ये बसले पाहिजे, बोलले पाहिजे, एवढी गोष्ट जर तुम्हाला समजते नसेल तर हा उरबडवेपणा काय कामाचा? तुमच्याऐवजी काल जर विसर्जनाच्या जागी मुस्लिम आडनावाचा कोणी असता तर कल्पना करा आपण काय गहजब केला असता? त्यामुळे हा बेगडीपणा आता बंद करा.

 

Web Title :- Sushma Andhare On Navneet Rana | shivsena leader sushma andhare slams mp navneet rana over inappropriate ganesh visarjan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा