Nashik Crime News | कोयत्याने वार करुन पैशांची बॅग लुटणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांकडून अटक, रोकड जप्त

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – Nashik Crime News | कंपनीची उधारीची रक्कम जमा करुन दुचाकीवरून जाणाऱ्या व्यक्तीवर धारदार कोयत्याने वार करून पैशांची बॅग लुटणाऱ्या (Robbers) टोळीला उपनगर पोलिसांच्या पथकाने (Nashik Police) अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून 1 लाख 68 रुपयांपैकी 1 लाख 40 हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वडनेर पाथर्डी रोडवर (Vadner Pathardi Road) साई ग्रँड लॉन्स समोर घडली होती.(Nashik Crime News)

चंद्रकांत विजय काकडे (वय-23 रा. काकडे गल्ली, रोकडोबावाडी, नाशिक रोड, नाशिक), शाहबाज शफि खान (वय-21 रा. मदिना नगर, रोकडोबावाडी, नाशिकरोड, नाशिक), सोनु छबु गवळी (वय-20 रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव, नाशिकरोड, नाशिक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रकाश बन्सी मरसाळे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Nashik Crime News)

प्रकाश मरसाळे हे कंपनीची उधारीची रक्कम गोळा करुन दुचाकीवरुन वडनेर पाथर्डी रोडने विहीतगाव कडे जात होते. साई ग्रँड लॉन्स (Sai Grand Lawns) समोर एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या चार जणांनी प्रकाश यांची दुचाकी अडवली. आरोपींनी प्रकाश यांच्याकडे असलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विरोध केला. त्यावेळी आरोपींनी प्रकाश यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन पैशांची बॅग पळवून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात प्रकाश मरसाळे यांनी फिर्याद दिली.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस पथकाचे पोलीस अंमलदार सोमनाथ गुंड व जयंत शिंदे यांनी
बातमीदराकडून रोकडोबावाडी परिसरातील दोन संशयित व्यक्तींची माहिती मिळवली.
तसेच पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केले.
पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली आय 20 (एमएच 12 जीबी 6704) कार जप्त केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन (API Shantaram Mahajan) करीत असून पोलीस हवालदार गोविंद भामरे हे मदत करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत
(DCP Monica Raut), सहायक पोलीस आयुक्त आनंदा वाघ (ACP Ananda Wagh) यांच्या सुचनेनुसार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे (Senior PI Vijay Pagare), पोलीस निरीक्षक गुन्हे बाबासाहेब दुकले
(PI Babasaheb Dukle) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी
(API Sachin Chaudhary), पोलीस अंमलदार विनोद लखन, सोमनाथ गुंड, अनिल शिंदे, जयवंत शिंदे, पंकज कर्पे,
सुरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रघतवान, राहुल जगताप यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Home Remedies To Remove Winter Tan From Lips | हिवाळ्यात ओठांचे टॅनिंग झाले असेल, तर गुलाबी ओठांसाठी अवलंबा हे ५ घरगुती उपाय

Soha Ali Khan Exercise | फिट राहण्यासाठी अभिनेत्री सोहा अली खान करते ‘ही’ एक्सरसाइज, जाणून घ्या तिचे ‘फिटनेस सीक्रेट’

Juice in Winters | हिवाळ्यात ज्यूस पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींची 35 लाखांची फसवणूक, वाघोली परिसरातील प्रकार