Pune Pimpri Chinchwad Crime News | चारचाकी गाडी देण्याच्या बहाण्याने तीन तरुणींची 35 लाखांची फसवणूक, वाघोली परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | तीन तरुणींच्या नावाने वाहन कर्ज (Car Loan) घेऊन कर्जाच्या रकमेचा अपहार करुन चारचाकी गाडी न देता 35 लाखांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाघोली येथील फ्लेव्हर ऑफ झारखंड हॉटेल (Flavor of Jharkhand Hotel) येथे घडला आहे. याप्रकरणी झारखंड (Jharkhand) येथील एका व्यक्तीवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Pune Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत शिखा पुरुषोत्तम पांडे Sikha Purushottam Pandey (वय-30 रा. निंबाळकर नगर लोहगाव, मुळ रा. टाटानगर, जमशेदपुर, झारखंड) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. यावरुन संदीप कुमार मुखी Sandeep Kumar Mukhi (वय-32 रा. ग्राम कदमा उलियान, ता. ईस्ट सिंगभूम जि. जमशेदपूर, झराखंड) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी व त्यांच्या इतर दोन मैत्रिणींना चारचाकी गाडी खरेदी करायची होती.
आरोपी संदीप मुखी याने त्यांचा विश्वास संपादन करुन चारचाकी गाड्या घेण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणींना
कर्ज घेण्यास भाग पाडले. कर्ज मंजूर झाल्यानंतर आरोपीने काही रक्कम स्वत:कडे ठेवून उर्वरित रक्कम त्याच्या
बँक खात्यात जमा करुन घेतली. त्यानंतर संदीप मुखी याने फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणींना गाडी दाखवली नाही तसेच
कोणतेही कागदपत्रे दिले नाहीत. फिर्यादी यांनी गाडीबाबत विचारणा केली असता संदीप याने टाळाटाळ करुन फिर्यादी
व त्यांच्या मैत्रिणींकडून घेतलेल्या 35 रुपयांचा अपहार (Embezzlement) करुन आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खराडीतील पिटर इंग्लंड दुकानात चोरी, पावणे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

Maharashtra Crime News | बालसुधारगृहातून पळालेल्या मुलांचा नागपूर, गोंदियात राडा; पोलिस शिपायाला केले जखमी, गोंदियात पोलीस व्हॅनची तोडफोड, रिक्षाचालकाला लुटले

Jayant Patil On BJP | ”राम मंदिर कोणत्याही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही”, निमंत्रणाच्या राजकारणावरून जयंत पाटलांची भाजपावर टीका

Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल