Soha Ali Khan Exercise | फिट राहण्यासाठी अभिनेत्री सोहा अली खान करते ‘ही’ एक्सरसाइज, जाणून घ्या तिचे ‘फिटनेस सीक्रेट’

नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि सैफ अली खानची बहीण सोहा अली खान फिटनेसच्या (Soha Ali Khan Exercise) बाबतीत वरचढ आहे. ती इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सौंदर्य आणि फिटनेस (Beauty and Fitness) पाहून चाहते प्रभावित होतात. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हेवी वर्कआउट आणि एक्सरसाइज करताना दिसत आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. (Soha Ali Khan Exercise)

सोहा अली खानचे फिटनेस सीक्रेट
सोहा तंदुरुस्त राहण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबतच (Physical Health) मानसिक आरोग्याची काळजी घेते. ती पुरेसे पाणी पिते आणि पुरेशी झोपही घेते. फिटनेस राखण्यासाठी ती नियमितपणे एक्सरसाइज आणि वर्कआउट (Exercise and Workout) करते, आहाराकडेही लक्ष देते.

सोहा अली खान कोणत्या एक्सरसाइज करते?
फिट राहण्यासाठी सोहा नियमितपणे व्यायाम आणि वर्कआउट करते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती विविध एक्सरसाइज करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती रोप एक्सरसाइज, डंबेल एक्सरसाइज, पुशअप्स, स्क्वॅट्स, जंपिंग आणि वॉर्म अप करताना दिसत आहे. हे सर्व सोहाचे आवडते व्यायाम आहेत. ती सहसा कार्डिओ, क्रंचीज, बर्पी, प्लॅन्क इत्यादीसह धावणे आणि एरोबिक्स करते. (Soha Ali Khan Exercise)

सोहा अली खानचा डाएट प्लॅन
एक्सरसाइजसोबतच सोहा डाएटबाबतही खूप सक्रिय असते. ती बाहेरचे खाणे टाळते. घरचेच बनवलेले अन्न खाणे ती पसंत करते. सोहाने एका मुलाखतीत सांगितले की, ती तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास गरम मेथीचे पाणी पिऊन करते. नाश्त्यात तिला डोसा किंवा ऑम्लेट किंवा फळे वगैरे खायला आवडतात. दुपारच्या जेवणात सोहाला मासे, डाळ, भाजी, रोटी किंवा ब्राऊन राईस वगैरे खायला आवडते. रात्रीच्या जेवणातही सोहा फक्त हलके घरगुती जेवण खाते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

खराडीतील पिटर इंग्लंड दुकानात चोरी, पावणे 5 लाखांचा मुद्देमाल लंपास

Maharashtra Crime News | बालसुधारगृहातून पळालेल्या मुलांचा नागपूर, गोंदियात राडा; पोलिस शिपायाला केले जखमी, गोंदियात पोलीस व्हॅनची तोडफोड, रिक्षाचालकाला लुटले

Jayant Patil On BJP | ”राम मंदिर कोणत्याही एका पक्षाची प्रॉपर्टी नाही”, निमंत्रणाच्या राजकारणावरून जयंत पाटलांची भाजपावर टीका

Pune Traffic Updates | कोरेगाव भिमा – पेरणे फाटा: विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल