Nashik Graduate Constituency | नाशिक पदवीधर मतदारसंघात नवा ट्वीस्ट; सत्यजीत तांबेंनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन- महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्षाला सोडल्यानंतर आज दि.१२ माजी आमदार सुधीर तांबे माघार घेत आपल्या मुलाला पाठींबा देण्याचे ठरविले (Nashik Graduate Constituency). काँग्रेस पक्षाकडून एबी फॉर्म मिळून देखील सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपली माघार घेतली.त्यानंतर सुधीर तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. भाजपकडून उमेदवारीसाठी सत्यजीत तांबे यांच्या नावाची चर्चा होती. पण त्यातच सत्यजीत तांबेंनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केल्यानंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. ( Nashik Graduate Constituency)

भाजपकडून तांबेंना ऑफर देण्यात आली होती. तशी चर्चा देखील रंगली होती. त्यामुळेच भाजकडून नाशिक पदवीधर संघाच्या उमेदवारीच्या घोषणेत विलंब होत असल्याची चर्चा रंगली होती. पण आज सुधीर तांबे यांनी स्वतःची काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारत मुलगा सत्यजीत तांबे याला संधी दिली आहे. त्यानंतर सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. (Nashik Graduate Constituency)

नुकतच, शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना बोलताना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते की,
‘जर सत्यजीत तांबेंना भाजपकडून उमेदवारी दिली गेली तर ती खरच खूप आनंदाची गोष्ट आहे.’ (Nashik Graduate Constituency)

बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय असलेल्या तांबे कुटुंबाने नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा गड राखला होता. या मतदारसंघात माजी आमदार सुधीर तांबेंसारखा नेता काँग्रेसला लाभला होता.
त्यात आज अधिकृतरित्या काँग्रेस पक्षाने त्यांना एबी फॉर्म देवून देखील त्यांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेत त्यांचा मुलाला संधी दिली.

दरम्यान, अचानक नाशिक पदवीधर मतदारसंघात आलेल्या ट्वीस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Web Title :- Nashik Graduate Constituency | sudhir tambe withdrawal from the graduates constituency election satyajeet tambe is mva congress candidature

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Tejas Thackeray | पोस्टरबाजीमुळे पुन्हा एकदा तेजस ठाकरे राजकीय मैदानात उतरण्याच्या चर्चांना उधान