
Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. दरम्यान याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी युतीबाबत जास्त न ताणता प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर करावी. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. (Sanjay Shirsat)
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, ‘राजकारणात भूमिका मागे पुढे करावी लागते. त्याशिवाय प्रकाश आबेडकरांची कोणाशी युती होईल, असे वाटत नाही. एकनाथ शिंदेबाबत त्यांचे मत त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी युतीबाबत जास्त न ताणता योग्य ती भूमिका तातडीने जाहीर करावी. आगामी महापालिका , नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीत एक वेगळा मेसेज त्यांना देता येईल. याबाबत ते लवकरच भूमिका जाहीर करतील.’ अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. संजय शिरसाट म्हणाले, ‘मी मागेही अनेकदा सांगितलं की संजय राऊत यांना आता उपचाराची गरज आहे. गेल्यावेळी ते म्हणाले होते की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डावोसला जाऊन बर्फ खेळणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एका चांगल्या कामाला जात असेल तर त्याच्यावर टीका करायची, हा त्यांचा स्वभाव आहे. १९ तारखेला पंतप्रधान येणार आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. अडीच वर्षात जी कामं थांबली होती. ती आता मार्गा लागणार आहे, त्यामुळे पंतप्रधान मोदींचा दौरा महत्त्वाचा आहे.’ असे ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रावर देखील भाष्य केले.
आदित्य ठाकरे यांनी सिवेज ट्रीटमेंट प्लांटच्या उद्धाटनाला सहा महिने उशीर का केला असा प्रश्न पत्रात
महापालिका आयुक्तांना विचारला होता. त्यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, ‘आदित्य ठाकरेंना
काहीही माहिती नाही. असे अनेक प्रकल्प आहेत. ज्याचे उद्घाटन आधीच्या काळात झाली आणि लोकार्पण
पुढच्या सरकारमध्ये झाले आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.
Web Title :- Sanjay Shirsat | sanjay shirsat reaction on prakash ambedkar eknath shinde meeting
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Kolhapur Crime | खळबळजनक! लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर अत्याचार, कळंबा जेल अधिकाऱ्याला अटक
Nitesh Rane | ‘तो फक्त सिरीयल पुरताच आहे…,’ म्हणत नितेश राणेंकडून अमोल कोल्हेंवर एकेरी शब्दात टीका