Nashik MLC Election | उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत चर्चा झाली नाही- नाना पटोले

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक पदवीधर मतदारसंघातून (Nashik MLC Election) काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र अर्ज दाखल करण्याच्या काही वेळापूर्वी सुधीर तांबे यांनी माघार घेतली. तर सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने सुधीर तांबे यांना एबी फॉर्म दिला होता परंतु त्यांनी माघार घेतली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला (Nashik MLC Election) आहे. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी भाजपचा (BJP) पाठिंबा घेण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नाना पटोले म्हणाले, मी मीडियाद्वारे ही बातमी बघत होतो. डॉ. सुधीर तांबे यांचे वक्तव्यंही मी ऐकत होतो. सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ. नेमकं काय झालं त्याची कारणं का? या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतरच यावर पक्षपातळीवर चर्चा करुन, निश्चितपणे जे काही झालं, त्यावरचं स्पष्टीकरण आम्ही तुम्हाला देऊ. भाजपचे लोक काहीही बोलू शकतात. म्हणून मी सांगतोय की सगळी माहिती घेऊनच आम्ही प्रतिक्रिया देऊ.

काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती.
उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असंही नाना पटोले यांनी सांगितले.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील (Nashik MLC Election) उमेदवारातच अचानक बदल
का करण्यात आला, याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे माहिती घेऊन भाष्य करेन असे पटोले यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती घेतली जात आहे.
सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करावं, हे त्यांनीच ठरवावं असेही नाना पटोले यांनी म्हटले.
उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)
यांच्यासोबत चर्चा झाली असे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला, त्याची कारणे काय,
यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

Web Title :- Nashik MLC Election | graduate constituency election the first reaction of congress after sudhir tambe withdrew from the election

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी 100 कोटी, लवकरच 20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करणार

Aurangabad ACB Trap | घराचा उतारा देण्यासाठी 9 हजार रुपये लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात