Nashik News : दुर्देवी ! माहेरहून नाशिककडे निघालेल्या ज्योती राठी अन् 3 वर्षाच्या जियाचा मृत्यू, गोदापात्रात तरंगताना मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील गोदावरी नदीत मायलेकीचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ज्योती राठी वय 25 व जिया वय 3 वर्ष असे या महिलेचे व मुलिचे नाव असून या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर माहिती अशी म्हऱ्हळ येथून नाशिककडे ज्योती आपल्या मुलीसह माहेरी निघाल्या होत्या दरम्यान दिनांक 4 तारखेला नांदूरशिंगोटे येथील बसस्थाकावरुन बेपत्ता झाल्या होत्या. बेपत्ता झाल्याची फिर्यात वावी पोलीसात देण्यात आली होती. पोलीसांनी या मायलेकीचा तपास सुरु केला होता. मात्र कोणतीची माहिती मिळत नसल्याकारणाने त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान बेपत्ता झाल्याचा फोटो सु्द्धा समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. असे असताना नाशिक शहरातील गोदावरी नदिपात्रात रामवाडी पूलाजवळ तरंगताना या मायलेकीचा मृतदेह आढळून आला. मात्र ओळख पटत नव्हती, असे असताना चिमुरडी जियाचा मृतदेह गांधी तलावात आढळून आला. दरम्यान दोन्हीही मृतदेह मिळाल्यानंतर त्यांची ओळख पटली.