Nashik News । ते छत्रपती आहेत का? फडणवीसांच्या टीकेला नाशिकच्या पोलिस आयुक्तांचं उत्तर

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  Nashik News | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राणेंवर नाशिक (Nashik) येथे गुन्हा दाखल झाला. तत्पूर्वी महाडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यावरून राणेंना जामीन (Bail) मंजूर झाला. मात्र नाशिकमध्ये (Nashik News) दाखल झालेल्या गुन्ह्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिक पोलीस आयुक्तांवर निशाणा साधला होता. यावरून आता नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय (CP Deepak Pandey) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी आयुक्त पांडेय हे माध्यमांशी बोलत होते.

‘माझे ज्ञान अल्प असून विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्र्यांचे ज्ञान अफाट आहे.
त्यामुळे कायद्याचा आधार घेऊन नाशकात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त पांडेय (CP Deepak Pandey) यांनी दिली आहे.
त्यावेळी ते म्हणाले, ‘आमचे पथक मंत्रीमहोदयांना अटक करण्यासाठी गेले होते.
हे पथक संगमेश्वर येथे पोहचले तेव्हा राणे यांना रायगड पोलीस घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली.
रात्री उशिरा पर्यंत सुरू असलेल्या सुनावणीत कोर्टात नाशिक पोलिसांनी आपली भूमिका मांडली आहे.
२ सप्टेंबर रोजी राणे यांनी नाशिकमध्ये हजर राहावे अशी विनंती केलीय.
त्यानुसार त्यांना यावे लागणार आहे.
नाशिक पोलिसांनी बजावलेल्या नोटीसवर मंत्र्यांनी सही देखील केलीय.
त्यांनी सहकार्य केले नाही तर पुढील कारवाई होऊ शकते. असं त्यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या विधानावरून पोलीस आयुक्त पांडेय (CP Deepak Pandey) यांना प्रश्न विचारला असता, त्यावरून त्यांनी संयमाने उत्तर दिलं आहे.
‘विरोधी पक्षनेते आणि केंद्रीय मंत्री यांना खूप ज्ञान आहे. माझं ज्ञान अल्प आहे.
त्यानुसार मी कायद्याला धरून नोटीस काढल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले आहे. ‘मी माझ्या आदेशावर ठाम आहे.
कोणाला त्यावर आक्षेप असेल तर संविधानातील तरतुदींनुसार न्यायालयात जाऊन आदेश रद्द करवून घेऊ शकतात, असं त्यानीं म्हटलं आहे.

 

काय म्हणाले होते फडणवीस?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश काढले होते.
त्यावर सर्वत्र भाजपनं संताप व्यक्त केला होता.
नाशिकचे पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.

 

Web Title : nashik news | nashik police commissioner deepak pandey gives befitting reply to devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | भाजप नगरसेवकाकडून मित्राच्या पत्नीला शारीरिक संबंधाची ऑफर, महिलेनं डायरेक्ट केलं ‘हे’ काम (व्हिडीओ)

Pune News | पर्यावरणाशी समतोल साधत पुण्यात होणार भूमिगत विकास

Post Office मधून सुकन्या समृद्धी योजनेत जमा लाखो रुपये झाले ‘गायब’, जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण?