National Apprenticeship Training Scheme | 7 लाख तरूणांसाठी उघडतील रोजगाराचे दरवाजे, ‘ही’ विशेष योजना मोदी सरकारने पुढील 5 वर्षांसाठी वाढवली

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मोदी सरकारने (Modi Government) ‘नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’ (National Apprenticeship Training Scheme ) पुढे आणखी 5 वर्षासाठी वाढवण्याची घोषणा केली आहे. ही माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल (Union Minister of Commerce and Industry Piyush Goyal) यांनी एका ट्विटद्वारे दिली. पीयूष गोयल यांनी म्हटले की, या ट्रेनिंगच्या (National Apprenticeship Training Scheme) मदतीने 9 लाख तरूणांना शिकणे आणि कमावण्याची संधी (opportunity to learn and earn) मिळेल. सरकारच्या या योजनेद्वारे तरूणांना ट्रेनिंग दिले जाते जेणेकरून रोजगारासाठी ते सक्षम व्हावेत.

केंद्र सरकारनुसार, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम’ (NATS) पुढील 5 वर्षासाठी वाढवली आहे. यासाठी सरकार 3,054 कोटी रुपयांची मदत देईल. एनएटीएस प्रोग्राम अंतर्गत 9 लाख तरूणांना ट्रेनिंग दिले जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, या ट्रेनिंग प्रोग्राममुळे पुढील 5 वर्षात 7 लाख तरूणांना रोजगार देण्यात मदत मिळेल.

किती मिळेल स्टायपेंड

NATS प्रोग्राममध्ये ज्या तरूणांना ट्रेनिंग दिले जाईल, त्यांना 8,000-9,000 रुपयांची स्टायपेंड मिळू शकते. या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये इंजिनियरिंग, ह्यूमेनिटीज, सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल.

सरकारच्या योजनेनुसार, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राममध्ये भाग घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल डिव्हाइसेस मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा सेक्टर आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ट्रेनिंग दिले जाईल.

किती रुपये होतील खर्च

सरकारने पुढील 5 वर्षासाठी या ट्रेनिंग प्रोग्रामवर 3,000 कोटी रुपये खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. ही रक्कम मागील पाच वर्षाच्या खर्चापेक्षा 4.5 पट जास्त आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अप्रेंटिसशिपवर जोर देण्याची बाजू मांडण्यात आली. (National Apprenticeship Training Scheme)

हे पाहता एनएटीएस प्रोग्रामवर खर्च होणारी रक्कम वाढवण्यात आली. प्रत्येक क्षेत्रातील तरूणांना ट्रेनिंग देऊन रोजगाराच्या लायक बनवता यावे, यासाठी सरकारने विविध विषयाच्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग देण्याची सुविधा सुरू केली आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि इंजिनियरिंगचे विद्यार्थी या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी होतील. योजनेचा हेतू विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता वाढवून त्यांना रोजगार मिळवण्यालायक बनवणे आहे. पुढील 5 वर्षात यातून 7 लाख तरूणांना रोजगार दिला जाऊ शकतो. (National Apprenticeship Training Scheme)

विद्यार्थ्यांना कोणते ट्रेनिंग मिळेल

विद्यार्थ्यांना मोबाइल मॅन्युफॅक्चरिंग, मेडिकल डिव्हायसेस मॅन्युफॅक्चरिंग, फार्मा सेक्टर आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये ट्रेनिंग देऊन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) सोबत जोडले जाईल.

PLI स्कीममध्ये सहभागी झाल्यानंतर ट्रेनिंग घेतलेले तरूण स्वताचा रोजगार सुरू करू शकतात.
‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीने हे परिणामकारक पाऊल ठरू शकते. ”
या योजनेच्या मदतीने देशात कुशल आणि ट्रेंड लोक तयार होतील ज्यांची मदत कंपन्या किंवा उद्योग क्षेत्र घेऊ शकतात.

औद्योगिक क्षेत्रात नोकर्‍यांची मागणी वाढेल ज्यामुळे रोजगार वाढवण्यात मदत मिळेल.
सरकारने नुकतेच गतीशक्ती मिशन सुरू केले आहे, ज्यासाठी भविष्यात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित तरूणांची गरज असेल.
अप्रेंटिसशिप प्रोग्राममध्ये ट्रेनिंग मिळवलेले तरुण गतीशक्ती मिशनमध्ये सहभागी होतील.

 

Web Title : National Apprenticeship Training Scheme | Modi Government Modi cabinet approves continuation of national apprenticeship training scheme for next five years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | शाळेची बस सुटल्याने 14 वर्षीय विद्यार्थ्याने उचलले ‘हे’ टोकाचं पाऊल

MLA Nitesh Rane | ‘ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही तर खानच्या पोराची चिंता’ – नितेश राणे

IPL 2022 | आयपीएलच्या टीमना बाहेर खेळण्याची परवानगी द्या, BCCI कडे मागणी

Chala Hawa Yeu Dya Maharashtra Daura | ‘चला हवा येऊ द्या’च्या निलेश साबळेंनी नारायण राणेंची पाया पडून मागितली माफी; जाणून घ्या प्रकरण

Nanded Crime | दारूसाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाचा केला खून

Local Body Elections | आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काँग्रेसचा स्वबळाचा नारा;
आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष?

Bad Habits | तुम्हाला वेगाने वृद्धत्वाकडे ढकलताहेत ‘या’ 5 वाईट सवयी, आजच सोडून द्या