गरीब आणि वंचितांसाठी चालणार मोदी सरकारचे विशेष अभियान, बनवणार 2 कोटी रेशन कार्ड; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अ‍ॅडवायजरी जारीकरून नवीन रेशन कार्ड (New ration card) बनवण्याचे अभियान सुरू करण्यास सांगितले आहे. खालच्या स्तरातील अशा लोकांना रेशन कार्ड देऊन त्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या कक्षेत आणले जाईल. केंद्रीय अन्न सचिव सुधांशु पांडेय यांनी सांगितले की, देशात जवळपास दोन कोटी लोकांना नवीन रेशन कार्ड (New ration card) दिले जाऊ शकते. पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Amit Deshmukh : राज्यात महाविकास आघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण…

 

कष्टकरी, कामगार, बेघरांना कार्ड
त्यांनी सांगितले की, शहर आणि ग्रामीण गरीब, कचरा वेचणारे, फेरीवाले, रिक्ष चालक, प्रवासी मजूर, बेघर लोक आणि फिरणार्‍या कुटुंबांची रेशन कार्ड बनवली जातील.
कोरोना संसर्गाच्या दरम्यान गरीब, कमजोर आणि वंचित वर्गातील लोकांना रेशन न मिळाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पत्ता नसल्याने या लोकांना रेशन कार्ड बनवता आलेले आलेले नाही.
राज्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी समाजातील खालच्या स्तरातील अशा लोकांसाठी विशेष अभियान राबवून रेशन कार्ड बनवावे.

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,229 नवीन रुग्ण, 25,617 जणांना डिस्चार्ज

4.39 कोटी बोगस रेशन कार्ड रद्द करणार
अन्न सचिव पांडेय यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील 4.39 कोटी बोगस रेशन कार्ड ( Ration Card) रद्द करून त्याऐवजी नवीन रेशन कार्ड बनवली आहेत.
या प्रक्रियेत समाजातील खालच्या स्तराला प्राथमिकता दिली पाहिजे.
अन्न मंत्रालयाच्या अ‍ॅडवायजरीमध्ये 15 दिवसात रिपोर्ट मागितला आहे.

गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना
कोरोनाच्या दुसरी लाट पाहता केंद्राने गरीब कुटुंबासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना घोषित केली आहे. या अंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांना मे आणि जून महिन्यात प्रति व्यक्ती पाच कि.ग्रॅ. अतिरिक्त अन्न मोफत दिले जात आहे.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

Gold Silver Price Today : खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी स्वस्त अन् चांदी देखील घसरली, जाणून घ्या आजचे दर