COVID-19 : मोठ्यांसह छोट्यांची सुद्धा झोप उडवतोय ‘कोरोना’, जाणून घ्या – ‘स्लीप’ कन्सल्टंट केरी बजाज यांचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – भारतासह संपूर्ण जग सध्या घातक महामारी कोरोना व्हायरसला तोंड देत आहे. मोठ्या संख्येने लोक आरोग्य समस्यांशी लढत आहेत. एवढेच नव्हे, मोठी माणसं आणि लहान मुलांची झोप सुद्धा कमी झाली आहे. देशातील प्रसिद्ध स्लीप कन्सल्टंट केरी बजाज म्हणतात, आपल्या मुलांना निद्रानाशापासून दूर ठेवा.

केरी बजाज भारतातील त्या निवडक स्लीप कन्सल्टंटपैकी एक आहेत, जे सध्या कोरोना संकटात निर्माण झालेल्या निद्रानाशाच्या समस्येला तोंड देणार्‍या लोकांना मदत करत आहेत. त्या मुंबईत राहतात आणि सध्या सोशल मीडियावरून निद्रानाशावर मुले आणि मोठ्यांना सल्ला देतात. त्यांनी मुलांना झोप न येण्याच्या समस्येवर एक पुस्तक लिहिले आहे, त्याचे नाव स्लीप बेबी स्लीप आहे.

मोठ्यांनाही सल्ला देत आहेत चाईल्ड स्लीप कन्सल्टंट

केरी बजाज मागच्या काही वर्षांपासून भारतात चाईल्ड स्लीप कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. सध्या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे झोपेची समस्या मुलांसह मोठ्यांनाही होत आहे. केरी यांनी वॉशिंग्टन डीसीचे जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटी आणि न्युयॉर्कमधून इंटीग्रेटिव्ह न्युट्रीशन इन्स्टीट्यूटमधून शिक्षण पूर्ण केले आहे. न्युयॉर्क मध्ये डॉक्टर फ्रँक लिपमॅन यांच्या सोबत त्या अनेक वर्षे न्यूट्रीशनिस्ट म्हणून सुद्धा काम करत होत्या. अमेरिकेत त्यांनी नवजात बाळ आणि मुलांच्या झोपेवर संशोधन केले आहे. लग्ननंतर मागील तीन वर्षांपासून त्या मुंबईत राहून चाईल्ड स्लीप कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत.

तुम्हाला स्लीप कन्सल्टंट बनण्यासाठी कुणी प्रेरित केले?

माझी मुलगी जेव्हा सात महिन्यांची होती, तेव्हा ती रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत झोपून राहायची. लोक तिच्या झोपण्याच्या या वेळेवरून मला नेहमी प्रश्न विचारायचे. चांगली आणि पूर्ण झोप घेण्याचा अधिकार प्रत्येक मुलाचा आहे. ज्या लोकांना अनिद्रेची समस्या असते, जेव्हा मी त्यांना मदत करते, तेव्हा मला चांगले वाटते. जेव्हा पालक सांगतात की, माझ्यामुळे त्यांचे मुल पूर्ण झोप घेत आहे, तेव्हा त्यांचे हे वाक्य माझ्यासाठी पुरस्कारासाखे असते.

प्रोफेशनल स्लीप कन्सल्टंट बनण्याचा विचार कसा आला ?

तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी भारतात आले, तेव्हा मी पाहिले येथील पालक मुलांना झोपवणे आणि त्यांना चांगली झोप देण्याचा प्रयत्न करत असतात. मला त्यांची मदत करायची होती. यासाठी मी हे काम सुरू केले.

मागील काही दिवसात मी एका 18 महिन्याच्या बाळासोबत काम करत होती. जे रात्री अनेक वेळा उठत होते, आणि त्याची झोप बाधित होत होती. मोठी मुलं तर आपली समस्या सांगतात, पण छोटी बाळं काहीही सांगू शकत नाहीत. त्या मुलाच्या वयानुसार, मी त्याचे नॅप शेड्युल बनवले. सर्वात आधी तर सकाळी 4 वाजता जे फीड केले जात होते ते बंद केले. त्याच्या झोपण्याच्या वेळेत बदल केला. ज्यापद्धतीने त्याला बिछाण्यावर झोपवले जात हेाते, त्याच्यातही बदल केले. परिणामी, आता ते रात्रभर झोपू शकते. सकाळी ते हसत-हसत उठते. त्याचे पालक सुद्धा निश्चिंत झाले आहेत आणि त्यांना सुद्धा चांगली झोप येत आहे.

कोरोनामुळे लोक तणावात आहेत, झोपेवर होतोय परिणाम

कोरोनामुळे अनेक लोक तणावात दिसत आहेत. यामुळे मोठेच नव्हे, तर लहान मुलांचीही झोप कमी झाली आहे. यावर उपाय खुप सोपा आहे. केवळ आपली दिनचर्या ठरवल्यास यावर मात करता येईल. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. यामुळे मुलांमध्ये स्कुलबस पकडण्याची घाई नसते. त्यांची झोपण्याची वेळ बिघडली आहे. शारीरीक क्रिया सुद्धा कमी झाल्या आहेत. मुलांनी जास्त झोप घ्यावी, यासाठी आईने लक्ष दिले पाहिजे. 11 तासांची झोप मुलांसाठी चांगली मानली जाते. आपल्या मुलांना दिवसभर सक्रिय ठेवा. त्यांना पझल, ऑब्सटेकल कोर्सेस आणि यूट्यूबवरील कॉस्मिक किड्स योगा, झुंबा नृत्य आदीशी जोडण्याचा प्रयत्न करा.