Corona Medicine : दिलासादायक ! पुढील आठवड्यात लाँच केले जाईल DRDO चे कोरोनारोधक औषध 2-DG, प्रत्येक स्ट्रेनवर परिणामकारक

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) औषध 2 डीआक्सी-डी ग्लूकोज (2-डीजी) च्या 10 हजार डोसची पहिली बॅच पुढील आठवड्याच्या सुरुवातीला लाँच केली जाईल. ही माहिती डीआरडीओच्या अधिकार्‍यांनी दिली. अधिकार्‍यांनी म्हटले की, भविष्यात औषधाच्या वापरासाठी उत्पादनात वेग आणण्याचे काम केले जात आहे. हे औषध डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या एका टीमने बनवले आहे.

File photo

औषध 2-डीजी कोरोनाच्या उपचारात गेम चेंजर ठरू शकते. कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी हे औषध एखाद्या संजीवनीपेक्षा कमी नाही. 2डीजीच्या साईड इफेक्टबाबत डॉक्टर सांगतात की, सामान्य पेशींचे मेटाबालिज्म (अन्नाला उर्जेत परावर्तित करण्याची प्रक्रिया) संक्रमित पेशींपेक्षा एकदम वेगळे असते. औषधाची मात्रा सामान्य पेशींपर्यंत कमीच जाते आणि त्यांचे कोणतेही नुकसान होत नाही.

कोविड-19 च्या प्रत्येक स्ट्रेनवर उपयोगी
डीआरडीओच्या शास्त्रज्ञांनुसार, 2डीजी कोरोनाच्या प्रत्येक स्ट्रेनशी लढण्यासाठी सक्षम आहे. या औषधाचे मेकॅनिझम व्हायरसच्या प्रोटीनऐवजी, मानवी पेशींच्याच प्रोटीनमध्ये बदल करते, ज्यामुळे व्हायरसला पेशींच्या आत शिरकाव करता येत नाही. इतर अँटी व्हायरस औषधे व्हायरसच्याच प्रोटीनवर वार करतात आणि जेव्हा व्हायरसमध्ये म्युटेशन होते तेव्हा औषधे मोठ्या प्रमाणात निष्प्रभ होतात. हैद्राबाद येथील डॉ. रेड्डी लॅबद्वारे 2डीजी वर करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलचे प्रमुख शास्त्रज्ञ असलेले आयएनएमएसचे डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. सुधीर चांदना यांनी पाहिले की, तिसर्‍या टप्प्यातील ट्रायलमध्ये हे औषध अनेक व्हेरियंटवर प्रभावी आहे.