देशात सुमारे 8 कोटी लोकांना देण्यात आली कोविड-19 ची लस, जाणून घ्या लसीकरणात कोणतं राज्य आघाडीवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे देशात जलद गतीने लसीकरण करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, आतापर्यंत जवळ जवळ आठ करोड लोकांना कोरोनाचे लसीकरण देण्यात आले आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सांगितले आहे की गेल्या २४ तासांत १६,३८,४६४ लोकांना लस देण्यात आली आहे. तेच देशात सोमवारी ७ वाजेपर्यंत एकूण ७,९१,०५,१६३ लोकांना लस देण्यात आली आहे. यात ६,८६,७८,८३८ लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि १,०४,२६,३२५ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या २४ तासांत १५,४०,६७६ लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे, तेच ९७,७८८ लोकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोना लसीकरणात महाराष्ट्र प्रथम स्थानी
सरकारद्वारे दिल्या गेलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा पहिला डोस घेण्यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. येथे एकूण ६८,७९,९७५ लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. यानंतर गुजरातमध्ये ६५,५२,८१६ आणि राजस्थान ६०,२०,६३९ लोकांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे.

कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे
कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेण्यात उत्तर प्रदेश सर्वात पुढे आहे. येथे आतापर्यंत १०,७८,०३९ लोकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानंतर राजस्थानमध्ये ८,४७,९८७ आणि गुजरातमध्ये ८,३७,६१९ लोकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

कोरोनाच्या सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यात महाराष्ट्र्र सर्वात पुढे आहे. येथे एकूण ७६,८६,९२१ लोकांना कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ७३,९०,४३५ आणि राजस्थानमध्ये ६८,६८,६२६ लोकांना डोस देण्यात आला.

कोरोना व्हायरसची एकूण प्रकरणे जवळ जवळ १ करोड २० लाख पेक्षा जास्त आहेत. नोंदणीद्वारे रोज येत असलेली नवीन प्रकरणांमध्ये देशात ७,४१,८३० कोरोना सक्रिय प्रकरणे आहेत