Coronavirus Lockdown : केरळमध्ये दारू न मिळाल्यानं दोघांची आत्महत्या, आता सरकार देतंय ‘अल्कोहल पास’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीच्या दरम्यान केरळ सरकारने मद्यपान करणाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर विशेष अल्कोहोल पास देण्याचा निर्णय घेतला आहे. जे लोक त्वरित दारूचे व्यसन सोडू शकत नाहीत त्यांनाच हा पास दिला जाईल. उत्पादन शुल्क विभागाकडून हे लोक दारू खरेदी करतात. सोमवारी रात्री सरकारने याबाबत आदेश काढला. या आदेशानुसार सरकारने सांगितले की, राज्यात लॉकडाऊनमुळे दारूची दुकाने बंद पडल्यामुळे आत्महत्येची अनेक घटना घडल्या आहेत. जे लोक नियमितपणे मद्यपान करतात ते नैराश्याला बळी पडत आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

अधिसूचनेनुसार, कोणतीही व्यक्ती शासकीय डॉक्टर किंवा सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन जवळच्या उत्पादन शुल्क श्रेणी कार्यालयात सादर करू शकते. यात असा उल्लेख असला पाहिजे कि, तो दारू त्वरित सोडू शकत नाही. यासाठी एक फॉर्मही देण्यात आला आहे, जो अल्कोहोल पास घेण्यासाठी भरावा लागतो. या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग त्या व्यक्तीस इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल) खरेदी करण्यास परवानगी देईल.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) म्हटले आहे की, केरळ सरकारचे हे पाऊल वैज्ञानिक आधारावर नाही. अल्कोहोल पासऐवजी अशा व्यक्तीला रुग्णालयात उपचार मिळावेत, अशी सूचना त्यांनी केली. केरळ शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटना (केजीएमओए) देखील राज्य सरकारच्या या आदेशाविरोधात पुढे आली आहे. ते म्हणाले आहेत की, महारे संस्थेशी संबंधित डॉक्टर अल्कोहोल पाससाठी प्रिस्क्रिप्शन देणार नाहीत.

शनिवारी त्रिशूर जिल्ह्यातील कोडगलूर येथे एका युवकाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. दुसर्‍या घटनेत, कयाकमुलम येथे न्हाव्याच्या दुकानात काम करणाऱ्या 38 वर्षीय व्यक्तीने दारू न मिळाल्यामुळे निराशेने शेव्हिंग लोशन प्याला. जेथे त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला.

You might also like