National Lok Adalat in Pune | राष्ट्रीय लोक अदालतीचे यशस्वी आयोजन ! 64 हजार प्रलंबित दावे निकाली काढून पुणे राज्यात प्रथम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – National Lok Adalat in Pune | प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख (Chief District and Sessions Judge Sanjay A. Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये (National Lok Adalat 2022) ६४ हजार ३७३ प्रलंबित दावे निकाली काढून पुणे जिल्हा (Pune District) राज्यात पुन्हा एकदा अग्रेसर राहिला आहे. (National Lok Adalat in Pune)

 

राष्ट्रीय लोक अदालतीसाठी (National People’s Court Pune) १२५ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या माध्यमातून अनेक दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले. प्रलंबित १६ हजार ६९५ प्रकरणांसोबतच विशेष मोहिमेच्या माध्यमातून १७ हजार ७१४ आणि वादपूर्व २९ हजार ९६४ प्रकरणे अशी एकूण ६४ हजार ३७३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.

तडजोडीसाठी ठेवण्यात आलेल्या ४७ हजार ४४२ प्रलंबित प्रकरणांमधून १६ हजार ६९५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि यात ४७ कोटी ४१ लाख तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. वादपूर्व १ लाख ८२ हजार २४७ दाव्यापैकी २९ हजार ९६४ दावे निकाली काढण्यात येऊन ५० कोटी ६६ लक्ष रुपये तडजोड शुल्क (Compromise Charges) वसूल करण्यात आले. एकूण ४६ हजार ६५९ दावे निकाली काढण्यात येऊन ९८ कोटी ७ लक्ष रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले. (National Lok Adalat in Pune)

विशेष मोहिमेअंतर्गत ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान २२ हजार ६८८ दावे सुनावणीसाठी घेण्यात येऊन त्यापैकी १७ हजार ७१४ निकाली काढण्यात आले आहेत. अशा प्रकारे पुणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीच्या आयोजनादरम्यान दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी – कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले असे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर प्रताप सावंत (Civil Judge Senior Level Pratap Sawant) यांनी सांगितले.

 

ठळक वैशिष्ट्ये –

1. चार वर्षानंतर ग्राहक न्यायालयाची (Consumer Court, Pune) प्रकरणे लोक अदालतीमध्ये सुनावणीसाठी घेण्यात आली.
त्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि ४१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

2. मोटार अपघात न्यायाधिकरणासाठी (Motor Accident Tribunal, Pune) नियुक्त पॅनलमार्फत ८५ वर्षाच्या वृद्ध महिलेला न्याय मिळाला.
या महिलेला ३४ लाखाची भरपाई मिळाली.

3. अपघातात एका पाय तुटलेल्या व्यक्तिलादेखील न्याय मिळून ५० लाखाची भरपाई मिळाली.
विशेष म्हणजे त्याला न्याय मिळावा म्हणून वकीलांनी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले नाही.

4. घटस्फोटासाठी अर्ज (Divorce Applications In Lok Adalat) केलेल्या ४० जोडप्यांनी लोक अदालतीत सामंजस्याने परत संसार करण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे महिलांसाठी असणाऱ्या स्वतंत्र पॅनलने घेतलेल्या सुनावणीनंतर १२ जोडपे पुन्हा एकत्र येण्यास तयार झाले.
या पॅनलवर सर्व सदस्य आणि कर्मचारी महिला होत्या.

 

Web Title :- National Lok Adalat in Pune | Successful organization of National People s Court Pune First in the state of Pune after settling 64 thousand pending claims

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा