‘डेड बॉडी’मुळं फोफावत नाही ‘कोरोना’, पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास काही एक धोका नाही : AIIMS संचालक

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज पसरलेले आहेत. हेच गैरसमज दूर करणासाठी दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले की, कोरोना व्हायरस हा मृतदेह म्हणजेच डेड बॉडीजच्या माध्यमातून पसरत नाही. तो संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शिंकणे आणि खोकण्याच्या ड्रॉपलेट्समधून पसरतो. हा व्हायरस पसरण्यासाठी खोकला किंवा शिंकणे जरूरी आहे. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात कोणताही धोका नाही.

कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या दिल्लीतील एका 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. शनिवारी सकाळी जेव्हा महापालिकेच्या बोध घाटावर त्या महिलेचा मृतदेह आणण्यात आला तेव्हा महापालिका बोध घाटावरील कर्मचार्‍यांनी अंत्यसंस्कार करू दिले नाहीत. कोरोनाच्या भितीपोटी असे केल्याचे बोलले जात आहे. मात्र, नंतर अधिकार्‍यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉक्टरांची टीमसुद्धा हजर होती. यानंतर आरोग्य सेवा महासंचालनालयाने म्हटले की, कोरोनामुळे मृत्यूच्या बाबतीत सतर्कतेसह अग्नी संस्कार करता येईल.

सावधतेने मृतदेहावर अग्नीसंस्कार करा
आरोग्य सेवा महासंचालनालयाने म्हटले की, कोरोनामुळे मृत्यूच्या प्रकरणात सावधगिरीने मृतदेहावर अग्नी संस्कार केल जाऊ शकतात. महासंचालनालयानुसार कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात काहीही धोका नाही. मृतदेहावर अंत्यसंस्कार वी, सीएनजी किंवा लाकडांचा वापर करून करावेत.

घाबरण्याची गरज नाही, सावधगिरी बाळगा
डॉ. गुलेरिया यांच्यानुसार, आतापर्यंत कोरोनाची जेवढी प्रकरणे समोर आली आहेत, त्यामध्ये जवळपास 80 टक्के रूग्ण सदी, खोकल्यासारख्या अतिशय छोट्या आजाराने ग्रस्त होते आणि सामान्य औषधांनी बरे झाले. रूग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कोरोना व्हायरसला नष्ट करते. चिंता केवळ त्या रूग्णांची असते जे ज्येष्ठ असल्याने त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेली असते. अशावेळी रूग्णाला आयसीयूमध्ये ठेवावे लागते. या व्हायरसच्या संसर्गाचा धोका रूग्णाच्या जवळ म्हणजे दोन ते तीन मीटर जवळ गेल्याने होतो.

ज्येष्ठांना संसर्गाची जास्त भिती
डॉ. गुलेरिया म्हणाले, चीनसह दुसर्‍या देशात कोरोनाचा संसर्ग मुलांमध्ये कमी आणि ज्येष्ठ व्यक्तींमध्ये जास्त झाला आहे. हे रोगप्रतिकारशक्तीमुळे होते. मुलांमध्ये खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणे आढळल्यास संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. अशा मुलांना शाळेत पाठवू नये. एम्समध्ये कोरोनाच्या रूग्णांसाठी सर्व जरूरी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रूग्णांना वेगळे ठेवण्यासाठी आयसोलेशन सेंटरसुद्धा बनवण्यात आले आहेत.