PM Kisan Samman Nidhi : 25 डिसेंबरला शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये येणार 2000 रुपयांचा हप्ता, PM मोदी साधणार संवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) च्या 7 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांची आता प्रतिक्षा संपली आहे. केंद्र सरकार 25 डिसेंबर म्हणजे शुक्रवारी पीएम किसान योजनेचा 7वा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे पीएम किसान योजनेचे पैसे पुढील दोन दिवसानंतर शेतकर्‍यांच्या खात्यात येतील. या दरम्यान 6 वेगवेगळ्या राज्यात शेतकर्‍यांसोबत पीएम मोदी यांची चर्चा सुद्धा होईल. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी सरकारने राबवलेल्या विविध उपक्रमांवर पीएम-शेतकर्‍यांसोबत आपले अनुभव सांगतील.

पीएम मोदी यांच्यासोबत कृषीमंत्री सुद्धा उपस्थिती असतील. 9 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी शेतकर्‍यांच्या कुटुंबांच्या खात्यात 18,000 कोटी रूपयांपेक्षा जास्त पैसे वळते केले जातील. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत शेतकर्‍यांना प्रत्येकवर्षी केंद्र सरकारकडून रोख 6,000 वार्षिक दिले जातात. केंद्र सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना थेट पैसे देत आहेत. मोदी सरकार शेतकर्‍यांना वर्षात 4 हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात.

पीएम मोदी शेतकर्‍यांशी साधणार संवाद
25 डिसेंबर म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी पीएम नरेंद्र मोदी शेतकर्‍यांशी संवाद साधतील. यावेळी अवधच्या शेतकर्‍यांशी पीएम मोदी नव्या कृषी कायद्याचे महत्व सांगतील. सोबतच उत्तर प्रदेश भाजपा कार्यकर्ते, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे पत्र घेऊन घरोघरी जातील. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीला 25 डिसेंबरला संपूर्ण उत्तर प्रदेशात अडीच हजार शेतकर्‍यांशी संवाद साधतील. भाजपा पूर्ण राज्यात अडीच हजारपेक्षा जास्त ठिकाणांवर शेतकर्‍यांशी संपर्काचे अभियान राबवणार आहे, ज्यामध्ये शेतकरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांना जोडण्याचा हा सर्वात मोठा मेगा कार्यक्रम होणार आहे. एकट्या अवधमध्ये 377 ठिकाणे असतील, तर संपूर्ण उत्तर प्रदेशात अडीच हजारपेक्षा जास्त ठिकाणी कार्यक्रम होतील.

असे चेक करा तुमचे रेकॉर्ड
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थींच्या यादीत नाव तपासायचे असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी या वेबसाईटवर तपासू शकता.

असे चेक करा स्टेटस
पीएम किसान वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन. होम पेजवर मेन्यू बार पहा आणि येथे फार्मर कार्नर वर जा. येथे बेनिफिसरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील. आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे, त्यामध्ये तो नंबर टाका. तो नंबर टाकून गेट डाटा वर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारे स्टेटस दिसेल.