अरे बाबो ! सरकारची VIDEO CONFERENCE सुरु असताना अचानक सुरु झाली PORN CLIP

जयपूर : वृत्तसंस्था – सरकारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सवेळी अचानक पॉर्न क्लीप सुरु झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी(दि 3 जून ) अन्न व नागरी पुरवठा विभागाची बैठक घेण्यात आली. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली होती. यावेळी पॉर्न क्लीप सुरु झाली होती. या प्रकरणानंतर याबाबत चौकशी करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.

मुग्धा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात एनआयसी रुममध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आयोजित या बैठकीत स्क्रीनवर अचानक पॉर्न क्लीप सुरु झाली. या प्रसंगानंतंर मुग्धा सिंग यांनी पाऊल उचलत एनआयसीच्या संचालकांना बोलावले आणि याप्रकरणी चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. मुग्धा सिंग यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीला तब्बल 10 जण उपस्थित होते. त्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि एनआयसीचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. याशिवाय तब्बल 33 राज्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचाही या व्हिडीओ कान्फरंसिंगमध्ये सहभाग होता. विविध योजना आणि कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पॉर्न सुरु झाल्याचा भलताच प्रकरा घडला. या प्रकारामुळे तिथे उपस्थित अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.

याबाबत बोलताना मुग्धा सिंग म्हणाल्या, “याप्रकरणी एनआयसीच्या अहवाल सादर झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल” असे त्या म्हणाल्या.