दिलासादायक बातमी : मोदी सरकारने कमी केले कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या Remdesivir चे दर, न मिळाल्यास ‘इथं’ करा तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असताना रसायन आणि खाते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी कोरोना उपचारात वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर औषधाबाबत मोठी खुशखबर दिली आहे. सरकार कोविड-19 च्या उपचारात वापरले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्व पावले उचलत आहे, जेणेकरून देशात याची उपलब्धता वाढवता येईल. डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शुक्रवारी म्हटले की, मागील पाच दिवसांच्या आत विविध राज्यांना एकुण 6.69 लाख रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

गौडा यांनी ट्विट करून म्हटले की, सरकार रेमडेसिविरच्या उत्पदानाच्या सुविधांचा विस्तार करणे आणि क्षमता आणि उपलब्धता वाढवण्यासाठी सर्व पावले उचलत आहे. सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर च्या प्रमुख निर्मात्यांनी स्वेच्छेने औषधाचे दर प्रति बाटली 5,400 रुपयांवरून कमी करून 3,500 रुपयांपेक्षा सुद्धा कमी केले आहेत. सोबतच सरकार देशात रेमडेसिवीरचे उत्पादन वाढवण्यासाठी सर्व पावले उचलत आहे.

या कंपन्या भारतात बनवतात रेमडेसिवीर

औषध नियंत्रक राष्ट्रीय औषध मुल्य निर्धारण प्राधिकारणाने रेमडेसिवीर औषध तयार करणार्‍या कंपन्यांचे डिटेल जाहीर केल्या आहेत. प्राधिकरणाने रेमडेसिवीर औषध बनवणार्‍या कंपन्यांची वेबसाइट, ई-मेल आयडी आणि 24 बाय 7 हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत.

रेमडेसिविरसाठी येथे करा तक्रार

टोल फ्री नंबर –  1800 111 255

ई-मेल :  [email protected]

वेबसाइट –  [email protected]