Weather Forecast : देशभरात ‘शीतलहरी’ सक्रिय, कोणत्या राज्यात काय असणार परिस्थिती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर भारतात वातावरणात सतत बदल होत आहेत त्यामुळे लोक त्रस्त आहेत. हवामान विभागाच्या मते पर्वतांवर बर्फ जमा झाल्याने बुधवारी तापमान कमी असेल. तर स्कायमेटच्या मते महाराष्ट्रशिवाय झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये हा आठवडाभर पावसाचा परिणाम दिसेल. महाराष्ट्राच्या किनारपट्टीय भागात चक्रावती दबाव क्षेत्र निर्माण होत आहे. याशिवाय आसाममध्ये सायक्लोनिक प्रेशर निर्माण झाले आहे.

जानेवारी संपला आहे आणि फेब्रुवारी सुरु झाला आहे, परंतु अजूनही पर्वतांवर सुरु असलेल्या बर्फवृष्टीने मैदानी प्रदेशात शीतलहरींचा प्रभाव आहे. मंगळवारी सांगण्यात आले की काही राज्यात 24 तास पाऊस होऊ शकतो. या राज्यात महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, दक्षिण भारताच्या शहरांचा समावेश आहे. येथे जोरदार गडगडाटांसह पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्रात विदर्भात देखील पाऊस होऊ शकतो. हा पाऊस नांदेड, अकोला, चंद्रपूर शहरात होऊ शकतो.

पूर्वी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसाच्या काही भागात एक दोन दिवसात राज्याच्या वेगवेगळ्या शहरात पाऊसाची शक्यता आहे. 5 फेब्रुवारीला मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात वादळी पाऊस होऊ शकतो आणि त्यानंतर थोडी कमी येईल.

उत्तर प्रदेश –
पूर्वांचलमध्ये बुधवारी सकाळी आकाश निरभ्र असेल, तापमान साधारण असे त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल. पुढील 24 ते 48 तास असे वातावरण राहण्याची शक्यता आहे.

पंजाब –
बुधवारी वातावरण स्वच्छ असेल. सकाळी धुके पडेल परंतु दिवस प्रखर ऊन असेल. 6 फेब्रुवारीपासून वातावरण पुन्हा बदलेल. चंदीगडच्या हवामान विभागाचा विचार केला तर 6 फेब्रुवारीला आकाशात ढग जमा होतील. 7 फेब्रुवारीला दिवसभर ढग दाटलेले असतील.

हिमाचल प्रदेश –
थंड वारे वाहतील, सकाळ संध्याकाळ कडाक्याची थंडी असेल. बर्फवृष्टी देखील होऊ शकते. 5 ते 6 फेब्रुवारी दरम्यान वातावरण साफ असण्याची शक्यता आहे. 7 फेब्रुवारीला काही ठिकाणी बर्फवृष्टी होऊ शकते.

दिल्ली –
कडाडणारी थंडी वाढणार आहे. दिवसा तापमान साधारण असेल परंतु सकाळ संध्याकाळी मात्र थंडी कायम असेल. पर्वतीय भागात बर्फवृष्टी झाल्याने तापमान आणखी कमी होऊ शकते.

बिहार –
मंगळवारी दुपारी आकाश काळे होईल. शुक्रवारी काही भागात पावसाची शक्यता आहे. पटना हवामान विभागाच्या वैज्ञानिकांनुसार देशातील पश्चिमी भागात हवामानात बदल होतील.