1 एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – १ एप्रिलपासून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. सरकार घरगुती नैसर्गिक गॅसच्या किंमती १८ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. नव्या घरगुती गॅस धोरण २०१४ अंतर्गत दर सहा महिन्यांनी नैसर्गिक गॅसच्या किमती ठरवल्या जातात. हा फॉर्म्युला परदेशी बाजारातल्या किमतीवर आधारित असतो. सरकारच्या या निर्णयामुळे वाहनांमध्ये इंधनाच्या स्वरुपात वापरण्यात येणारा सीएनजी आणि घरगुती जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येमारा पीएनजी गॅसच्या किंमती वाढणार आहेत. यामुळे सामान्य माणसाच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.

रेटिंग एजन्सी केअरच्या रिपोर्टनुसार, घरगुती नैसर्गिक गॅसच्या किमती १८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मॅन्युफॅक्चरिंग, ट्रॅव्हल आणि एनर्जी सेक्टरमध्ये महागाई वाढू शकते. भारतातल्या नैसर्गिक गॅसच्या किमती या गॅस वितरक देश असलेल्या अमेरिका, रशिया आणि कॅनडा यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींनुसार ठरतात. एप्रिल-सप्टेंबर २०१९ च्या तिमाहीमध्ये नैसर्गिक गॅसच्या किमती ३.३६ डॉलरवरून वाढून ३.९७ डॉलर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपन्याही भारतातले दर वाढवू शकतात.

ह्याही बातम्या वाचा –

#Loksabha : तुल्यबळ उमेदवाराच्या शोधासाठी रोहित पवार नगरमध्ये दाखल